

Catch Monkey and Get 600 Rupees
ESakal
मुंबई : बिबट्या आणि मानव संघर्षानंतर आता मानव-माकड संघर्ष ऐरणीवर आला आहे. कोकणासह राज्याच्या विविध भागात माकडांनी उच्छाद घातला आहे. त्यामुळे आता उपद्रवी माकडे पकडण्यासाठी वन विभागाने योजना आखली असून माकड पकडणाऱ्याला सहाशे रुपये मिळणार आहेत. माकडांचा संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदीचा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव दोन वर्षे निर्णयाशिवाय पडून आहे.