
माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघाती निधन झालं. औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरटी देशमुख यांच्या उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली. तुळजापूरहून ते बीडच्या दिशेनं निघाले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत चालक आणि अंगरक्षकही होते. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.