Breaking माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

1985 ते 86 या दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भुषवले होते. याशिवाय त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता.

पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) यांचे आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी किडनीच्या विकारावरील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले.  त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.  1985 ते 86 या दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भुषवले होते. याशिवाय त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former chief minister shivajirao patil nilangekar pass away