Congress : काँग्रेसच्या माजी मंत्र्याला न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची शिक्षा

महावितरणचे अभियंता अमोल खुबाळकर यांना मारहाण केल्याचा आरोप
Congress
Congress esakal

काँग्रेसचे माजी सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Former Congress member Sunil Kedar has been sentenced to one year in prison by the district court )

महावितरणचे अभियंता अमोल खुबाळकर यांना मारहाण केल्याचा आरोप माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर होता. कलम ३५३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

काय आहे प्रकरण?

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या. वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले.

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले.

Shirdi Bus Accident : जखमींवर शासकीय खर्चातून उपचार; २ भाविकांची प्रकृती चिंताजनक, तर...

महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता.

या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली. शासनातर्फे ऍड. अजय माहुरकर यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com