Shirdi Bus Accident : जखमींवर शासकीय खर्चातून उपचार; २ भाविकांची प्रकृती चिंताजनक, तर...

Shirdi Bus Accident
Shirdi Bus AccidentSakal

डोंबिवली - शिर्डीला जाताना झालेल्या बस अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली.

Shirdi Bus Accident
Uorfi Javed : मी एकटी पडली नाही, महाराष्ट्र माझ्या पाठिशी; चित्रा वाघ संतप्त

अंबरनाथहुन नाशिकला निघालेल्या भाविकांच्या बसला आज पहाटे भीषण अपघात झाला होता. या अपघातात अंबरनाथच्या मोरीवली गावातील १० जणांवर काळाने घाला घातल्याची माहिती मिळताच अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली.

यावेळी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार असल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली. तसंच मंत्री दादा भुसे हे रुग्णालयात पोहोचले असून जखमींवर सुरू असलेल्या उपचारांकडे आमचं लक्ष असल्याची माहिती डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com