esakal | Breaking: अनिल देशमुख गायब, फोन 'नॉट रिचेबल'; ED कडून शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Anil deshmukh

Breaking: अनिल देशमुख गायब, फोन 'नॉट रिचेबल'; ED कडून शोध सुरू

sakal_logo
By
विराज भागवत

तीन वेळा समन्स बजावूनही देशमुख 'ईडी'च्या चौकशीसाठी गैरहजर

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या १०० कोटींच्या खंडणी वसुली (100 Crores Extortion Case) प्रकरणात ईडीच्या (Enforcement Directorate) रडारवर आहेत. ईडीने (ED) त्यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी (Summons) बोलावले होते. पण तीनही वेळा ते विविध कारणांमुळे हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने नुकतेच त्यांची ४ कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता (Property Seized) जप्त केली. या घटनेनंतर काही तासांतच अनिल देशमुख हे भूमिगत (Underground) झाल्याचे वृत्त टीओआयने दिले आहे. या कारवाईनंतर देशमुखांच्या शोधासाठी ईडीने आपली पथके तैनात केली आहेत. त्यातच महत्त्वाचे म्हणजे, अनिल देशमुख यांचा फोनही नॉट रिचेबल लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Former Maharashtra home minister Anil Deshmukh underground, ED searches his hideouts vjb 91)

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा

ईडीने रविवारी अनिल देशमुख यांच्या शोधासाठी काही पथके पाठवली होती. नागपूरजवळच्या अनेक विभागात त्यांनी देशमुखांचा शोध घेतला. अनिल देशमुख ज्या ज्या ठिकाणी जाऊन राहू शकतात अशा ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. रविवारच्या शोधमोहिमे अंतर्गत देशमुखांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी त्यांचा शोध घेण्यात आला. तसेच, काही संशयास्पद ठिकाणीदेखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहिम हाती घेतली. तीन वेळा समन्स बजावूनही देशमुख ईडी चौकशीला गैरहजर राहिले. त्यानंतर ते गायब असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्यांना शोधणे अधिकच कठीण जात आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी राष्ट्रवादी - नवाब मलिक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोलच्या घरी रविवारी सकाळी ईडीने छापा टाकला होता अशी माहिती मिळाली होती. ईडीकडून त्यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली गेली. सकाळी ईडीचे चार अधिकारी नागपूरमध्ये आले आणि त्यांनी काटोल तालुक्यात जाऊन अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी अनिल देशमुखांची शोधमोहिम सुरू होती अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

loading image