माजी आमदाराने लाल बावट्याची साथ सोडली, भाजपात जाहीर प्रवेश - Dhairyashil Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhairyashil Patil

Dhairyashil Patil : माजी आमदाराने लाल बावट्याची साथ सोडली, भाजपात जाहीर प्रवेश

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील पाटील यांचे कौतुक केले.

धैर्यशील पाटील प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते जनतेत राहून जनतेची कामं करणे यासंदर्भातलं त्यांचे सातत्य महत्त्वाचं आहे. धैर्यशील पाटील भाजपात असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला आनंद होतो.

भाजपने शेकापला मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रायगड शेकापचा बालेकिल्ला आहे. भाजपचे  ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. त्यातून सावरत असताना आता धैर्यशील पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :BjpDevendra Fadnavis