
Gopaldas Aggarwal News: महाराष्ट्र भाजप नेते आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी रविवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आपण पक्ष सोडत असून 13 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी 2019 मधील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.