आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad sonawane and atul benke
आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर

आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर

जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) दोन आजी माजी आमदारांचा वाद आता समोर आला आहे. त्यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On social media) झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या उद्धघाटन प्रसंगी ते एकत्र आले होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादानं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी काहीसं आक्रमक होत विद्यमान आमदार बेनके (Atul Benke) यांच्यावर टीका केल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. दरम्यान या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना कुणाला समजावं असा प्रश्न पडला होता. तेही काही काळ त्या दोघांमधील वाद पाहत उभे होते. असेही त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

त्याचं झालं असं की, जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्धघाटनप्रसंगी विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे आणि माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्यासह पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्यही उपस्थित होते. उद्धघाटन सोहळा झाल्यानंतर व्यासपीठावर आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सध्या एका व्हि़डिओच्या माध्यमातून ती चकमक व्हायरल झाली आहे. अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर २ गावात रस्त्याच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे आणि आमदार अतुल बेनकेंमध्ये भर कार्यक्रमांत शाब्दीक वाद सुरु झाला. यामुळे काही काळ त्या कार्यक्रमामध्ये तणाव निर्माण झाला होता.

यावेळी शरद सोनवणे यांनी बेनके यांना ''आपले कर्तृत्व किती आपण बोलतो किती,'' असा टोला लगावला. यावर बेनके संतप्त झाल्याचे दिसून आले. अखेर उपस्थितांनी दोन्ही आमदारांमधील तो वाद सोडवला. आणि तो कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रमानंतरही बराच काळ त्यांच्यातील वादाची चर्चा परिसरात रंगल्याचे दिसुन आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top