"बाळासाहेबांनीच त्यांच घर..."; सभेपूर्वीच ठाकरे गटाचा रामदास कदमांवर घणाघात! - Ramdas Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

Ramdas Kadam : "बाळासाहेबांनीच त्यांच घर..."; सभेपूर्वीच ठाकरे गटाचा रामदास कदमांवर घणाघात!

खेड : महाराष्ट्राचे राजकीय तापमान सध्या कमालीचे तापले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावात (खेड) ही जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा खेड येथील गोळीबार मैदानावर होणार आहे. या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात जाहीरपणे पक्षप्रवेश करणार आहेत. त्याचवेळी माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय असलेले विश्वास कदम हेही पक्षात प्रवेश करणार आहेत.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी रामदास कदम आणि भाजपवर टीका केली आहे. अनंत गिते म्हणाले, खेड रामदस कदमांचे होम पिच असे म्हणने चुकीचे आहे. रामदास कदमांचे होम बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या घरात रामदास कदम मोठा झाला. हे होम पिच शिवसेनेचे आहे. 

केंद्रातल्या आणि राज्यातील भाजपने नीच राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या विरूद्ध संताप आहे. आता शिवसेनेतील घाण गेली आहे. शिवसेना सागरासारखी झाली, असे गिते म्हणाले.