
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. . शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बावी गावात दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले.