
बदलापूरमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. उल्हास नदीत बुडून दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. धूळवड खेळल्यानंतर चारही जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.