
वारजे : वारजे येथील स्व. रमेश वांजळे महामार्ग चौक उड्डाणपुलाजवळील सिग्नलसमोर पावसाळी वाहिनीच्या चेंबरजवळ एक मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, सायंकाळच्या वेळी अपघाताची शक्यता वाढल्याने सामाजिक कार्यकर्ते भारतभूषण बराटे यांनी तातडीने या खड्ड्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.