मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सोडत नव्यानं निघणार, कार्यक्रम जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची सोडत नव्यानं निघणार

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सोडत नव्यानं निघणार, कार्यक्रम जाहीर

मुंबई : सुप्रीम कोर्टात राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानं आता निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची जुनी सोडत रद्द केली असून नव्यानं आरक्षण सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यानुसार आता १३ महापालिकेसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. (Fresh lottery for reservation of local body Election in Maharashtra will be released)

राज्यातील मुंबई महापालिकेसह १३ महापालिका निवडणुका, २५ जिल्हा परिषदा २८४ पंचायत समित्या यांची निवडणूक जाहीर झाली होती. यासाठी आरक्षण सोडतही निघाली होती. पण आता दोन दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. त्यामुळं या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार असल्यानं आता या सर्व निवडणुकांसाठी नव्यानं आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

एससी-एसटीचं आरक्षण कायम राहणार

याचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण हे आरक्षण लोकसंख्येनुसार काढलं जातं त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. पण महिलांचं जे आरक्षण आहे ते रद्द करुन त्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण नव्यानं निघणार आहे. निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय असून त्यामुळं येत्या काळात अनेकांची धाकधुक वाढण्याची शक्यता आहे.