esakal | राज्यातील 11 साखर कारखान्यांकडे 'एफआरपी'ची 70 कोटींची थकबाकी
sakal

बोलून बातमी शोधा

FRP owes Rs 70 crore to 11 sugar factory in the state

'एफआरपी' थकबाकी असलेले कारखाने (कंसात रक्कम कोटीत): वारणा सहकारी, कोल्हापूर (38.77), किसनवीर, भुईंज सातारा (2.14), स्वराज इंडिया (3.50), घोडगंगा, पुणे (4.35), छत्रपती भवानीनगर, पुणे (15.75), फॅबटेक शुगर्स, सोलापूर (0.73), मातोश्री लक्ष्मी शुगर्स, सोलापूर (0.55), जयहिंद शुगर्स, सोलापूर (0.52), गोकुळ शुगर्स, सोलापूर (0.86), युटेक शुगर्स, अहमदनगर (0.80), श्री साईबाबा शुगर्स, शिवणी नांदेड (1.66). 

राज्यातील 11 साखर कारखान्यांकडे 'एफआरपी'ची 70 कोटींची थकबाकी

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : यंदाचा ऊस गाळप हंगाम तोंडावर आला तरी देखील राज्यातील 11 साखर कारखान्यांकडे मागील हंगामातील सप्टेंबरअखेर 'एफआरपी'ची 69.51 कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील हंगामातील 'एफआरपी'च्या थकबाकीप्रकरणी साखर आयुक्तांनी वारणा (कोल्हापूर) व युटेक शुगर्स (अहमदनगर) या दोन कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई केली आहे. 
साखर आयुक्तालयाने सप्टेंबर 2020 अखेर असलेल्या मागील हंगामातील 'एफआरपी' थकबाकीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. गतवर्षी राज्यात 145 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी 550.29 लाख टन उसाचे गाळप केले होते. या उसाची एकूण देय 'एफआरपी' 14055.27 कोटी रुपये होती. मात्र, गतवर्षीच्या दुष्काळात ऊस मिळविण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी काही कारखान्यांनी 'एफआरपी'पेक्षा जादा रक्कम ऊस उत्पादकांना दिली. राज्यातील कारखान्यांनी एकूण 14099.76 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे 'एफआरपी'च्या रकमेपेक्षा 113.66 कोटी रुपये जादा कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. असे असले तरी 134 कारखान्यांनीच मागील हंगामातील 'एफआरपी'ची शंभर टक्के रक्कम दिली असून आणखी 11 कारखान्यांकडे 69.51 कोटी रुपये थकीत आहेत. 11 पैकी चार कारखाने सहकारी व सात खाजगी आहेत. सप्टेंबर अखेर मागील सर्व हंगामातील मिळून 388.26 कोटी रुपये 'एफआरपी' थकीत आहे. 
एफआरपी थकबाकी असलेले कारखाने (कंसात रक्कम कोटीत): वारणा सहकारी, कोल्हापूर (38.77), किसनवीर, भुईंज सातारा (2.14), स्वराज इंडिया (3.50), घोडगंगा, पुणे (4.35), छत्रपती भवानीनगर, पुणे (15.75), फॅबटेक शुगर्स, सोलापूर (0.73), मातोश्री लक्ष्मी शुगर्स, सोलापूर (0.55), जयहिंद शुगर्स, सोलापूर (0.52), गोकुळ शुगर्स, सोलापूर (0.86), युटेक शुगर्स, अहमदनगर (0.80), श्री साईबाबा शुगर्स, शिवणी नांदेड (1.66). 

संपादन : वैभव गाढवे