मुंबई - तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोलपंपावर इंधनबंदी करण्याचा विचार असून, लवकरच त्याबाबतचे धोरण आणण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली..मंत्रालयात सोमवारी (ता. ५) झालेल्या मोटार परिवहन विभागाच्या बैठकीत बोलत होते. या वेळी परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, ‘दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पारंपरिक इंधनावरील वाहनांमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडते..त्यासाठी राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने मिळवितात किंवा अशी प्रमाणपत्र बनावट असल्याच्यादेखील तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.’.वाढत्या हवाप्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगाने घसरत आहे. त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार आहे.प्रत्येक पेट्रोलपंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशकांनुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. ‘पीयूसी’ नसेल तर इंधन नाही’ अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले..नियमांची अंमलबजावणी अपरिहार्यपर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचादेखील विचार केला पाहिजे, त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी आताच वायुप्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन सरनाईक यांनी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.