मुंबई - गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे. तब्बल १२ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा असल्याचा एकूण अंदाज आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून पैसे देण्यास मिळणारी दीड महिन्यांची मुदत बंद करण्यात आली आहे.