
Mumbai latest News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्यासाठी लवकरच नव्याने पूर्णपीठाची स्थापना केली जाईल, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २९) दिली.
मराठा आरक्षणाचे प्रकरण तातडीने ऐकणे आवश्यक असल्याचे म्हणत एका याचिकाकर्त्यांच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले. सरकारच्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर न्यायालयाने ही टिप्पणी केली.