esakal | भाजप सरकारने मला नि कुटुंबालाही छळलं, मंत्री गडाख यांचा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री शंकरराव गडाख

भाजप सरकारने मला नि कुटुंबालाही छळलं, मंत्र्यांचा गौप्यस्फोट

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : ‘‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र मी सखोल वाचले. त्यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मी आमदार नसताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनानंतर सत्तेचा गैरवापर करून मला अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला,’’ असा गौप्यस्फोट नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबादेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. (Gadakh says I was harassed during the BJP government)

हेही वाचा: गोदावरी कालव्यांसाठी आणखी ४४ कोटी रूपये, आ. काळेंचे अभिनंदन

गडाख म्हणाले, ‘‘शेतकरी आंदोलन प्रकरणात माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांत न्यायालयाची नोटीस माझ्यापर्यंत आली नव्हती. नोटीस न मिळाल्यामुळे मी शेवटच्या तारखेला हजर झालो नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ जणांच्या पोलिस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली व मला त्रास दिला. सत्ता मिळविण्याकरिता आणि राखण्यासाठी होणारे हे प्रकार दुर्दैवी असून, त्यांना आळा घालणं गरजेचं आहे.’’

तेव्हा गृहमंत्रिपद कोणाकडे होतं सर्वांना माहिती

‘‘पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. परंतु शिवसेनेची सत्ता असताना गृहमंत्रिपद कोणाकडे होतं आणि सत्ता कोण चालवत होतं, हे सर्वांना माहिती आहे. मी इतक्या खोलात जाणार नाही. पण मला या प्रकरणात खूप त्रास झाला आणि हे चुकीचं आहे. राजकारणात हा त्रास होत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये थेट कुटुंबाला त्रास देण्याचा जो प्रकार आहे, तो महाराष्ट्राला नवीन आहे. सत्ता घेण्याकरिता, राखण्याकरिता किंवा मिळविण्याकरीता जे दुर्दैवी प्रकार होताहेत, ते थांबले पाहिजेत.’’

कोरोना काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका टिप्पणीपेक्षा कृतीतून चांगले काम करण्यावर भर दिला. त्यामुळे लोकांचा महाआघाडी सरकार व त्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चांगले काम करेल.’’

उद्धव ठाकरेंचा अडचणीत आधार

मागील पाच वर्षांच्या काळात जरी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असले, तरी माझ्या अडचणीच्या काळात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला खूप मदत केली व आधार दिला होता, अशा शब्दांत कृतज्ञता मंत्री शंकरराव गडाख यांनी मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केली.(Gadakh says I was harassed during the BJP government)

loading image