Gadchiroli - २६ नक्षलवाद्यांची नावे आली समोर; लाखोचं होतं बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxal Flint

कारवाईत ठार झालेल्या सहा महिला नक्षलवाद्यांपैकी विमला उर्फ मान्सो ही मिलिंद तेलतुंबडेची बॉडीगार्ड होती.

गडचिरोली - २६ नक्षलवाद्यांची नावे आली समोर; लाखोचं होतं बक्षीस

महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 26 माओवाद्यांचा खात्मा शनिवारी (ता. 13) करण्यात आला. यात देशातील नक्षलवादी चळवळीचा सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते. गडचिरोली पोलिसांनी अजून याला अधिकृत दुजोरा दिला नाही. या चकमकीत पोलीस जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत  26 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यापैकी १६ जणांची ओळख पटली आहे. २६ पैकी ६ महिला नक्षलवाद्यांचा समावेश मृतांमध्ये आहे.

गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडमा पोड्डयाम, बंडू उऱ्फ दलसू राजु गोटा, प्रमोद उर्फ दलपत लालसाय कचलामी, कोसा उर्फ मुसाखी, चेतन पदा, किशन उर्फ जैमन, जिवा उर्फ दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे, महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा, भगतसिंग उर्फ प्रदिप उर्फ तिलक मानकुर जाडे, सन्नू उर्फ कोवाची, प्रकाश उर्फ साधु सोनू बोगा, लच्छु, नवलुराम उर्फ दिलिप हिरुराम तुलावी, लोकेश उर्फ मंगू पोडयाम/मडकाम हे पुरुष नक्षलवादी आहेत. तर नेरो, विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा या दोन महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. इतर दहा जणांची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा: इंजिनिअरिंग झालेला तेलतुंबडे नक्षलींचा देशातला सर्वात मोठा नेता

कारवाईत ठार झालेल्या सहा महिला नक्षलवाद्यांपैकी विमला उर्फ मान्सो ही मिलिंद तेलतुंबडेची बॉडीगार्ड होती. पीपीसीएम असलेल्या मान्सोवर ४ लाखांचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर ५० लाखांचे तर लोकेश उर्फ मंगू पोडयामवर २० लाखांचे बक्षिस होते. त्याशिवाय महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा याच्यावर १६ लाख आणि सन्नू उर्फ कोवाची याच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. इतर प्रत्येक नक्षलवाद्यावर २ लाख रुपये ते ६ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस होते.

loading image
go to top