
गडचिरोली : प्रत्येकाच्या घरात बहीण-भावंडांमध्ये टीव्हीच्या रिमोट वरून भांडण होत असतात. मात्र गडचिरोली येथील कोरची येथे राहणारे एका कुटुंबातील बहिणींचे टीव्ही रिमोटचे भांडण दुर्दैवी वळणावर गेल्याचे समोर आले आहे. मोठ्या बहिणीने टीव्हीचा रिमोट घेऊन चॅनेल बदलताच धाकट्या बहिणीने रागाच्या भरात गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली असून मुलीच्या आईची तब्येत खालावली आहे.