गडचिरोली: मोठ्या कारवाईबद्दल पोलिसांचं भेटून कौतुक करणार: पालकमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath-shinde

गडचिरोली: मोठ्या कारवाईबद्दल पोलिसांचं भेटून कौतुक करणार: पालकमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली: काल शनिवारी नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश प्राप्त झालं आहे. यामध्ये 26 माओवादी नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडर्सककडून कंठस्नान घालण्यात यश मिळालं. महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोटगुल ग्यारापत्ती जंगलात सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यात नक्षलवादी नेता मिलींद तेलतुंबडे हा ठार झाला आहे. याबाबत आता गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांचं कौतुक केलं आहे, तसेच ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: 26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर

त्यांनी म्हटलंय की, जीवाची बाजी लावून पोलिसांनी यश मिळवलं आहे. सध्या पोलिस अलर्ट असून परिस्थिती सर्वसामान्य आहे. सध्या चिंतेचं, भीतीचं वातावरण नाहीये. यातील जखमी पोलिसांवर योग्य उपचार करण्यात येईल. ही चकमक 9 ते 10 तास सुरु होती. पोलिस जवान, सी 60 टीम, सीआरपीएफ टीम गस्त घालत असताना गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. यामध्ये 26 नक्षलवादी ठार झाले. लाखो रुपयांचे बक्षीस असणारे नक्षलवादी ठार झाले आहेत. पालकमंत्री म्हणून मी बक्षीसाची रक्कम पोलिसांनी देण्याबाबत चर्चा करेन, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: हवामान बदलाच्या संकटावर जगातील नेते एकवटणार!

पुढे ते म्हणाले की, गडचिरोलीचा विकास हेच सरकारचं ध्येय आहे. नक्षल कारवायांवर गृहविभागाचं बारीक लक्ष आहे. कालची कारवाई विशेष आहे. इतर राज्यांनी देखील घेतली आहे. यात जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेला कंठस्नान घातलं आहे. सर्वांत मोठा कमांडर होता. आजूबाजूच्या नक्षलग्रस्त राज्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. सेंट्रल कमिटीचा तो सदस्य होता. त्याच्यावर तीन लेअरचं सुरक्षा कवच होतं. असं असताना देखील आपल्या पोलिसांनी त्याला ठार केलं आहे. त्याच्यावर राज्यात 50 लाखांपेक्षा जास्त बक्षीस होतं. नक्षलवाद्यांना मोठा धक्का देण्यात यशस्वी झालो आहोत.

loading image
go to top