26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर

26 नक्षलींचा खात्मा! कसं घडलं ऑपरेशन? काय होती स्ट्रॅटेजी? वाचा सविस्तर

गडचिरोली: काल नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश प्राप्त झालं आहे. कमीतकमी 26 माओवादी नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडर्सककडून कंठस्नान घालण्यात यश मिळालं आहे. महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोटगुल ग्यारापत्ती जंगलात सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यात नक्षलवादी नेता मिलींद तेलतुंबडे हा ठार झाल्याची माहिती आहे. काय आहे या कारवाईची ठळक वैशिष्ट्ये यावर एक नजर टाकूयात...

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

  • महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवर झालेली मोठी कारवाई ज्यामध्ये मिलींद तेलतुंबडेसह प्रमुख नक्षलवादी नेते ठार झाल्याची माहिती आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्यासह जहाल नक्षली जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

  • मिलींद तेलतुंबडे हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रदेशातील म्हणजेच मध्य भारतातील नक्षली चळवळीचा प्रमुख नेता होता. 'शहरी नक्षलवाद' या संकल्पनेचा अग्रदूत मानला जातो. गेल्या तीन दशकामध्ये नक्षली चळवळीला मोठा सुरुंग लावण्यात यश प्राप्त झालेली ही काल शनिवारची कारवाई

  • याआधी 22 ते 24 एप्रिल 2018 वेळी 37 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. यामध्ये 19 महिलांचाही सहभाग होता. या मोठ्या कारवाईनंतर घडलेली कालची मोठी कारवाई आहे.

  • सकाळी साडेसहा वाजता सुरु झालेलं हे ऑपरेशन सायंकाळी साडेचारपर्यंत सुरु राहिलं. त्यानंतर कमांडर्सनी जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरु केलं. मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी नक्षलवाद्यांना जवळपच्या गावात नेण्यात आलं. मात्र, अंधार वाढत गेल्यानंतर ते फार काळ सुरु ठेवता आलं नाही.

  • यामध्ये C60 कमांडर्समधील चार कमांडर्स जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूरला उपचारांसाठी नेण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या कारवायांमधील सर्वांत मोठा शस्त्रसाठा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान?

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलतुंबडेला छत्तीसगडस्थित विस्तार दलमकडून महाराष्ट्र सीमेवर नेले जात होते. तेलतुंबडे यांना कोरची दलमचे सदस्य आणि कंपनी क्र. 4 संरक्षण देत नेणार होते. त्या ठिकाणी किमान 40-45 नक्षलवादी तळ ठोकून होते.

  • याठिकाणी 16 C60 कमांडर्सच्या टीम पोहोचल्या आणि त्यांनी या नक्षलवाद्यांच्या कॅम्पला वेढा घातला. त्यानंतर त्यांनी शिस्तबद्ध रित्या त्यांच्यावर हल्ला चढवला. तिकडून नक्षलवाद्यांनी देखील हल्लाबोल केला. या गोळीबाराच्या संघर्षादरम्यानच माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, कमांडर्सनी त्यांच्या सुटकेचे सगळे मार्ग अडवून धरल्यामुळे त्यांची गोची झाली.

  • या मोहिमेतील जखमी जवानांना प्रथम धानोरा येथे आणण्यात आले आणि नंतर विमानाने नागपूरला नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या चारही जण स्थिर आहेत पण दोन जवान गंभीर जखमी आहेत.

loading image
go to top