
पाली : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. मात्र प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाला जाता येत नसल्यामुळे अनेकजण वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजार होतात. असाच एक प्रकार पनवेल शिवकर येथे दिसून आला आहे. पनवेल शिवकर येथून वारीसाठी जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांसाठी प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी (ता. 29) एक सामाजिक कार्य व वारकऱ्यांची सेवा म्हणून भोजन व्यवस्था केली. प्रसाद गायकवाड मागील 5 वर्षांपासून हा उपक्रम न चुकता राबवत आहेत.