Ganesh Visarjan:पुढच्या वर्षी लवकर या! दिमाखदार असं गणपतीचं विसर्जन, मुंबई-पुण्याच्या विसर्जनाबद्दल जाणून घ्या सर्वकाही

आज होणाऱ्या गणेश विसजर्नासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
Live Update
Live UpdateEsakal

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली; यंदा मिरवणूक २८ तास ३० मिनिटे चालली

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. यंदा मिरवणूक २८ तास ३० मिनिटे चालली आहे. शेवटचा गणपती मार्गस्थ झाला आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील शेवटचे गणपती अलका चौकात

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील शेवटचे गणपती अलका चौकात आले आहेत. पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत.

लक्ष्मी रोडवर रेंगाळल्या मिरवणुका

लक्ष्मी रोड वर मिरवणुका रेंगाळत आहेत. दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी पोलिसांनी डी जे बंद करून मंडळ पुढे घ्यायला सांगितले आहेत. कार्यकर्ते डी जे च्या तालावर नाचण्यात गुंग आहेत.

पुण्यातील चार महत्वाच्या रस्त्यावरून आतापर्यंत २०० मंडळांच्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील चार महत्वाच्या रस्त्यावरून आतापर्यंत २०० मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. अजून काही मंडळांच्या गणपतीचे विसर्जन बाकी आहे. मिरवणूक सुरू होऊन २७ तास झाले आहेत. पुण्यातील मिरवणुकीतील उत्साह अजून कायम आहे. डी जे वरून मिरवणूकाचा दणदणाट सुरूच आहे.

वर्सोवा समुद्रावर गणपती विसर्जन दुपारपर्यंत चालणार

मुंबईसह संपूर्ण देशभरात लाडक्या गणरायाची दहा दिवस विधिवत पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणरायाला निरोप देण्यास सुरुवात झाली. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या सर्वच चौपाट्यांवरील विसर्जनाचे काम पूर्ण झाले असले तरी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर मात्र अद्यापही गणपती विसर्जनाचे प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी 15 ते 20 गणपतीच्या मोठ्या मूर्ती विसर्जन होणे बाकी आहे. या मूर्तींचे विसर्जन होण्यासाठी दुपार उजाडण्याची शक्यता आहे

गेल्या २५ तासांपासून पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळांची विसर्जन सुरूच

गेल्या २५ तासांपासून पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक अद्याप ही सुरू आहे. गेल्या १ तासात पोलिसांनी तब्बल ७० ते ८० गणेश मंडळांना विसर्जनासाठी अलका टॉकीज मधून पुढे ढकलले आहेत. संपूर्ण विसर्जन मिरवणूक संपायला अजून १.५० तास लागण्याची शक्यता आहे.

मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

गणेश विसर्जनाला मुलुंडमध्ये गालबोट लागलं आहे. मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झाला आहे. मुलुंड अमर नगर सर्कल, मच्छी मार्केट, गुरू गोविंद सिंग मार्ग मुलुंड येथील रात्री उशिराची घटना आहे.

या हल्ल्यात गणेश खंदारे हा २३ वर्षाचा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खंदारे याच्यावर चाकूने हल्ला करणार्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

गिरगांव चौपाटीवरील गणेश विसर्जन संपलं

गिरगांव चौपाटीवरील गणेश विसर्जन संपलं आहे. तब्बल २२ तास गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या आहेत.

लालबागचा राजाला दिला निरोप, हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं केलं विसर्जन

लालबागचा राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं, हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं विसर्जन केलं. तब्बल २० तासांपेक्षा जास्त राजाची मिरवणुक चालली. लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता.

गणरायाच्या विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

गणेश विसर्जनानंतर आज मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृत फडणवीस या देखील स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा , खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी देखील इथे उपस्थिती लावली आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला संपायला अजून ३.५ ते ४ तास लागण्याची शक्यता

पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला संपायला अजून ३.५ ते ४ तास लागण्याची शक्यता आहे. अजून २०० मंडळांचे गणेश विसर्जन बाकी आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या मंडळांचा हा आकडा आहे. पुण्यातील गणेश मिरवणूक रेंगाळला जाण्याची शक्यता आहे.

तराफ्यावरुन लालबागचा राजा निघाला समुद्राच्या दिशेने; बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

तराफ्यावरुन लालबागचा राजा निघाला समुद्राच्या दिशेने रवाना झाले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे.

लालबागचा राजाचं विसर्जन सुरू; भक्तांचा जनसागर लोटला

कोळी बांधवाच्या आरतीनंतर आता लालबागचा राजाचं विसर्जन सुरू झालं आहे. विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला आहे.

लालबागच्या राजाचे विसर्जन ९ वाजता होण्याची शक्यता 

लालबागच्या राजाचे विसर्जन ९ वाजता होण्याची शक्यता आहे. समुद्राला ओहोटी आल्याने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला

तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे. समुद्राला ओहोटी आल्याने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.

पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणुकींचा उत्साह

पुण्यात काल रात्री उशिरापर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन झालं त्यानंतर शहरातील इतर गणेश मंडळांनी मिरवणुकींना सुरूनात केली. दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणुकींचा उत्साह शबरात दिसून येत आहे.

लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर काही वेळात होणार आगमान; आरती झाल्यानंतर होणार विसर्जन

लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर काही वेळात आगमान होणार आहे. आरती झाल्यानंतर लालबाग राजाचे विसर्जन करण्यात येणार आहे. तब्बल २० तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू आहे.

पालकमंत्री दिपक केसरकर गिरगावात दाखल, लवकरच लालबागच्या राजाचं होणार आगमण

मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर देखील गिरगाव चौपाटी येथे दाखल झाले आहेत. पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे आगमन होईल असे सांगण्यात येत आहे. सध्या लालबागचा राजा ओपेरा हाऊस येथे पोहचला असून त्याचे गिरगाव चौपाटी येथे पोहचल्यानंतर तेथे उत्तर आरती होईल आणि त्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.

गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम

काल मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यानंतर आज मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसेच मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या मोहिमेत सहभागी होणार आहेत. थोड्या वेळात या मोहिमेला सुरूवात होणार असून यामध्ये तब्बल ५ हजार स्वयंसेवक देखील सहभागी होतील.

पुण्यात गेल्या २१ तासांपासून मिरवणूक सुरूच

पुण्यात गेले २१ तासांपासून पुण्यात सर्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक सुरू आहे. दरम्यान अद्यापही पुण्यातील अल्का टॉकिज चौकात अजूनही विसर्जन मिरवणूक सुरू आहे, मोठ्या गणेशमंडळाच्या मिरवणूका संपन्न झाल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या गणपती मंडळांसाठी पोलिस काय भूमिका घेणार हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

लालबागचा राजा थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर पोहचणार

सध्या गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविक बाप्पांच्या विसर्जनासाठी पोहचले असून परळचा राजा, खेतवाडीचा राजा ही गणरायाची सर्वात उंच मुर्ती तसेच भायखळ्याचा विघ्नहर्ता यासोबतच इतरही परिसरातील स्थानिक गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनासाठी दाखल झाले आहेत.

या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काही वेळाने लालबागचा राजा, चिंतामणी तसेच गणेश गल्लीचा राजा हे विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहचतील. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक नागपाडा येथे दाखल.. भाविकांची अलोट गर्दी

लालबागचा राजा नागपाडा परिसरात दाखल..मोरयाच्या गजरात स्थानिकांकडून उत्साहास मिरवणुकीचे स्वागत... 

'पुढच्या वर्षी लवकर या..! CM शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाला भावपूर्ण निरोप

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक पद्धतीने कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विधीवत विसर्जन करण्यात आले.

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत मुकेश अंबानी यांचं आगमन

Ganesh Visarjan Live Update: लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत अंबानी कुटुंबियाांचं आगमन. मिरवणूक भायखळा अग्निशमन परिसरात पोहचली आहे

लालबागचा राजा भायखळा अग्निशमन हेडक्वार्टर्स परिसरात दाखल...

मिरवणूक मागील चौदा तासांपासून सुरूच, अग्निशमन दलाच्या जवानांकडून सलामी

वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मिरवणूक सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरु झालीये. सध्या मिरवणुक सुरु आहे.

लालबागचा राजा भायखळ्यात दाखल

लालबागच्या राजाची मिरवणुक भायखळा य़ेथे दाखल झाली आहे.

वर्षा बंगल्यावर बाप्पांची आरती सुरु

वर्षा बंगल्यावर बाप्पांची आरती सुरु झाली.

दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन पार पडलं

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यंदा राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला होता. यावेळी हे विसर्जन रेकॉर्डब्रेक वेळेत पार पडलं. याआधी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन मध्यरात्री व्हायचं.

दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी दाखल

दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी दाखल झाला आहे.

दगडूशेठ गणपती अल्का चौकात दाखल

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती अल्का चौकात दाखल झाला आहे. यंदा दगडूशेठ गणपतीचं विसर्जन लवकर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरगाव चौपाटीवर दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. यावेळी मंत्री गिरिश महाजन आणि दीपक केसरकर हे देखील उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री काही वेळात गिरगाव चौपाटीवर होणार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात गिरगाव चौपाटीवर दाखल होणार आहेत.

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; तब्बल ९ तासांहून अधिक काळ चालली मिरवणूक

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. गणपती विसर्जनाची ही मिरवणुक ९ तासांपेक्षा जास्त वेळ चालली.

मानाचा पहिल्या कसबा पेठ गणपतीचं ४ वाजून ३६ मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं, तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं ५ वाजून १२ मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचं ५ वाजून ५३ मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं, तर तुळशीबाग या मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन ६ वाजून ३२ मिनिटांनी करण्यात आलं. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन ६ वाजून ५९ मिनिटांनी करण्यात आलं.

मुंबईच्या राजाचं काही क्षणांत होणार विसर्जन

मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून काही क्षणांमध्ये विसर्जन पार पडणार आहे.

मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.

पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचं पार पडलं विसर्जन

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचं विसर्जन पार पडलं.

मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी

मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

मुंबईचा राजा गिरगावमध्ये दाखल

मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगावमध्ये दाखल झाला आहे.

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं विसर्जन पार पडलं

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं विसर्जन पार पडलं आहे.

पुण्यातील मानाच्या चार गणपतीचं विसर्जन

पुण्यातील मानाच्या चार गणपतीचं विसर्जन पार पडलं.

पुण्यातील मानाचा चौथा गणपतीचे विसर्जन घाटात आगमन

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन घाटात आगमन झाले आहे. मुठा नदीच्या पांचाळेश्वर घाटातील कृत्रीम तलावात विसर्जन होणार आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी श्रॉफ बिल्डींग येथे दाखल

चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती श्रॉफ बिल्डींग येथे दाखल झाला आहे.

मंत्री दादा भुसेंनी धरला 'तीन पावली'वर ठेका

मंत्री दादा भुसे यांनी ढोल वादन करत 'तीन पावली'वर ठेका धरला.

पुण्यातील मानाच्या तीन गणपतीचं विसर्जन संपन्न

पुण्यातील मानाच्या तीन गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. यामध्ये कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम गणपतीचा समावेश आहे.

गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं आहे.

पुण्यातील मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन संपन्न

पुण्यातील मानाचे पहिले दोन गणपती कसबा पेठ गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीच विसर्जन पार पडलं आहे.

लालबागचा राजा श्रॉफ बिल्डींग येथे दाखल, जोरदार पुष्पवृष्टी

लालबागचा राजा श्रॉफ बिल्डींग येथे दाखल झाला आहे. यावेळी नेहमीप्रमाणे पाचवेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती अल्का टॉकीज चौकात दाखल

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती अल्का टॉकीज चौकात दाखल झाला आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाच्या मुख्य रांगेच दाखल

दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाच्या मुख्य रांगेत दाखल झाला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध तेजूकाया गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु

मुंबईतील तेजूकाया गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु झाली आहे.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन

पुण्यातील मानाच्या दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन संपन्न झाला. विसर्जन करताना गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला.

मानाचा तिसरा गणपती अल्का टॉकीजजवळ

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती अल्का टॉकीज जवळ दाखल झाला आहे.

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती बेलगाव चौकात दाखल

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती बेलगाव चौकामध्ये दाखल झाला आहे.

केरळच्या पारंपरिक वाद्याने लक्ष वेधले

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावात केरळच्या पारंपरिक वाद्यांनी लक्ष वेधले. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी चांगलाच रंग भरला होता.

मानाचा तिसरा गणपती बेलगाव चौकात

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती बेलगाव चौकात दाखल झाला आहे.

पुण्यात पोलिस बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीस महिलांचाही समावेश

पुण्यात पोलिस बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीस महिलांचाही समावेश दिसून येत आहे.

कसबा पेठ गणपतीचं विसर्जन, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचं विसर्जन केल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कसबा पेठ गणपतीचं होतय विसर्जन

कसबा पेठ गणपतीचं विसर्जन होत आहे.

बाप्पांच्या मिरवणुकीत नेते थिरकले

बाप्पांचं विसर्जन करताना नेते नेते थिरकले आहेत.

मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन होणार

पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा पेठ गणपतीचं विसर्जन होणार आहे.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव देखावा

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव देखावा सादर करण्यात आला आहे.

जुहू चौपाटीवर गणेश विसर्जन सुरु

जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

बीड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

बीड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

मुंबईत विसर्जनासाठी आलेल्या तरुणावर कोसळली वीज

मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या त्याला मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात रुग्णवाहिणीतून नेण्यात आले आहे.

बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी

मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुक सुरु असताना पावसाला सुरुवात झाली आहे.

बोरिवलीतून उपनगराचा राजा मार्गस्थ

बोरिवलीतून उपनगराच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात; भक्तांची मोठी गर्दी

मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली आहे. भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांच्या मिरवणूका दिमाखात सुरू आहे.

कल्याणमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत राजकीय कमानींचा अडथळा 

कल्याणमधील रस्त्यावर लागलेल्या राजकीय कमानींचा बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत अडथळा निर्माण होत आहे. कल्याण पश्चिमेतील राजकीय कमानीमुळे बाप्पामूर्ती अडकली.कल्याण - डोंबिवली राजकीय कमानी काढा, गणेश भक्तांची आणि नागरिकांची मागणी आहे

लालबागचा राजाच्या मिरवणुकीवर भक्तांनी केली पुष्पवृष्टी

लालबागचा राजाच्या मिरवणुकीवर भक्तांनी पुष्पवृष्टी केली आहे.

अभिनेते आदेश बांदेकर लालबाग राजाच्या मिरवणुकीत झाले सहभागी

अभिनेते आदेश बांदेकर लालबाग राजाच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत, त्यांनी यावेळी डान्स तर केलाच मात्र ढोल वाजवत आनंदही साजरा केला.

चौपाट्यांवर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गर्दी

चौपाट्यांवर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गर्दी झाली आहे. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाली आहे.

पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ...

पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ झाले आहेत. इतर मंडळाचे गणपती देखील आता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. आपल्या लाडल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

मुंबई लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी

मुंबई लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. लालबागच्या राजावर स्थानिकांनी पुष्पवृष्टी केली. मिरवणुकीत मोठा जल्लोष दिसून येत आहे.

पुण्यात पोलिस बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीस महिलांचाही समावेश

पुण्यात पोलिस बंदोबस्तात तृतीयपंथी पोलीस महिलांचाही समावेश दिसून येत आहे.

पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल

पुण्यातील चौथा मानाचा तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल झाला आहे. गुलाल उधळत, फुलांची उधळण करत मोठ्या आनंदात आणि जल्लोषात गणरायाला निरोप दिला जात आहे. गणरायाच्या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी

मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. तर मुंबईच्या राजाची भव्य मिरवणुक सुरू आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग

श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोड ने भारतमाता जंक्शन भारतमाता जंक्शन येथून डॉ. बी.ए. रोडने गरमखाडा जंक्शन साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका - ना. म. जोशी मार्गने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भाखखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दला समोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- - नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड- संत सेना महाराज मार्ग- सुतार गल्ली माधव बाग- व्हि.पी. रोड- ऑपेरा हाऊस- गिरगांव चौपाटी- गिरगांव

लालबाग मार्केटमधून लालबागचा राजा विसर्जनासाठी झाला मार्गस्थ, भाविकांची मोठी गर्दी

लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. राजाला निरोप देण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पारंपारिक कोळी नृत्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. जवळजवळ 20 तासांहून अधिक काळ राजाची विसर्जन मिरवणूक चालते.

कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात

कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहचली आहे. भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. शहराच्या मध्यभागी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात

पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात झालेली आहे.

लालबागच्या राजाची आरती संपन्न; थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार

लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली आहे. काही वेळातच कोळी नृत्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. 

पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. बाप्पा पालखील विराजमान झाले आहेत.

पुण्यातील मानाचे कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी यांच्या मिरवणुकीला सुरूवात

पुण्यातील मानाचे कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी यांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

मुंबईचा मानाचा गणपती मुंबईचा राजा, विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबईचा मानाचा गणपती मुंबईचा राजा, विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे, सध्या लालबाग मध्ये प्रदक्षिणा घातल्या नंतर मुंबईचा राजावर पुष्प वृष्टी होईल.

मानाच्या गणपतींच्या आरतीसाठी चंद्रकांतदादांचा पुणे मेट्रोतून प्रवास

मानाच्या गणपतींच्या आरतीसाठी चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.

अनंत चतुर्दशीच्या निमित्त पुणे मेट्रो सेवेत ४ तासांची वाढ, २९ तारखेच्या पहाटे २ वाजेपर्यंत सुरु राहणार

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवेत ४ तासांची वाढ करण्यात येत असून प्रवासी २९ तारखेच्या पहाटे २:०० वाजेपर्यंत सेवेचा लाभ घेऊ शकतील.

राष्ट्रीय कला अकादमीतर्फे सायबर क्राईमवर आधारीत विसर्जन मार्गावर रांगोळी

थोड्याच वेळात पुण्यातील गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे.मानाच्या गणपती मंडळांची पुण्यातील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणुकीला सुरवात होत आहे. अशाच पुण्यातील विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला आकारणीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रांगोळी काढण्यात येत असते. यंदाच्या वर्षी सायबर क्राईम ही थीम घेऊन विसर्जन मार्गावर रांगोळी काढण्यात येत आहे. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सायबर क्राईम ची निगडित विविध संदेश देणाऱ्या रांगोळी या राष्ट्रीय कला अकादमी तर्फे काढण्यात येत आहे

पुण्यात गणपती विसर्जनाची धूम; कसबा गणपती मंडईकडे रवाना

पुण्यात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात गणरायची मिरवणूक काढण्यात येत आहे. कसबा गणपती मंडईकडे रवाना झाला आहे.

पुण्यातील तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात

पुण्यातील मानाच्या दुसऱ्या गणपतीची म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुक थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पारंपारिक पालखीतून गणपतीची विसर्जन मिरवणूक ९.४५ मिनिटांनी सुरु होणार आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकींना राज्यभरात सुरूवात; भाविकांची मोठी गर्दी

गणपती विसर्जन मिरवणुकींना राज्यभरात सुरूवात झाली आहे. राज्यभरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर मुंबईचा मानाचा पहिला मुंबईचा राजा मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशाच्या गजरात गणरायाची भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे.

अजित पवारांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचा 4 वाजता मिरवणूकसाठी निघणार

दुपारी 3.30 वाजता अजित पवारांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर 4 वाजता मिरवणूकीसाठी निघणार आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मुख्य मंदिरात विराजमान

आज सकाळी आरती करून कोतवाल चावडीवरून 7 वाजता वाजत गाजत दगडूशेठ हलवाई गणपती मुख्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आज चार वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे.

मानाचा पहिला मुंबईचा राजा झाला मार्गस्थ; भाविकांची मोठी गर्दी

मानाचा पहिला मुंबईचा राजा मार्गस्थ झाला आहे. भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील १७ रस्ते बंद राहणार; वाहतूक मार्गांत बदल

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत गुरुवारी (ता. २८) सकाळपासून शुक्रवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. 

दुधारीच्या तरुणाचा मिरवणुकीवेळी मृत्यू

नवेखेड : दुधारी (ता. वाळवा) येथील प्रवीण यशवंत शिरतोडे (वय ३५) याचा सोमवारी गावात आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना आकस्मिक की साऊंड सिस्टिमच्या उच्च आवाजाच्या परिणामाने याबाबत दुधारी व परिसरात चर्चा आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. व्हिसेरा राखून ठेवला आहे, असे इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.

मुंबईत गणेश विसर्जनासाठी 19,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात

मुंबई : गणेश चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनासाठी मुंबईत जय्यत तयारी झाली सुरु झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलानं देखील कबर कसली आहे. यासाठी तब्बल १९,००० पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्या नारायण यांनी सांगितलं आहे.

Live Update
Ganesh Visrjan 2023: मुंबईत गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; तब्बल 19,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत राडा; दोन मंडळांत हाणामारीसह दगडफेक

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक (Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur) मुख्य मार्गात आधी प्रवेश करण्यावरून दोन मंडळांच्या (Ganesh Mandal) कार्यकर्त्यांत रात्री साडेअकराच्‍या दरम्‍यान जोरदार वाद व हाणामारी झाली. त्यातून दगडफेकही झाली. यात देखावे पाहण्यासाठी आलेल्या दोघांसह एकूण तिघे जखमी झाले

Live Update
Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

गणेश विसर्जनासाठी मुंबई, पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज (गुरुवारी) सार्वजनिक मंडळांच्या (Ganesh Mandal) बाप्पांचे विसर्जन (Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur) होत आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झालीये. आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मुंबई, पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात आहेत. गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासाठी लालबाग-परळसाठी विशेष पोलीस व्यवस्था ठेवण्यात आलीये.

तर, पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेशोत्सवाची मिरवणूक आज अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात देखील भव्य अशा गणेश मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त आहे. सांगली, मिरजेत देखील आजच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com