Ganesh Visrjan 2023: मुंबईत गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; तब्बल 19,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात

मुंबई पोलिसांतील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : गणेश चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनासाठी मुंबईत जय्यत तयारी झाली सुरु झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलानं देखील कबर कसली आहे. यासाठी तब्बल १९,००० पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्या नारायण यांनी सांगितलं आहे. (Ganesh Visrjan 2023 around 2800 officers and 16000 policemen have been deployed)

नारायण यांनी सांगितलं की, "उद्या गणेश विसर्जनानिमित्त व्यापक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये जे विसर्जनाचे पॉईंट आहेत त्याठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये बॅरिकेटिंग, प्रशासकीय व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच सेक्टर वाईज बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे"

त्याचबरोबर जीवरक्षकांचाही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर विसर्जन मार्गांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच मार्शल, मोबाईल व्हॅन, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उद्या तैनात असतील. (Latest Marathi News)

Mumbai
Mumbai Rain Updates : कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपलं; रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

19000 हजार पोलीस तैनात

यामध्ये २,८०० पोलीस अधिकारी आणि १६,००० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दल (SRPF), क्वीक रिस्पॉन्स टीम (QRT), बॉम्ब डिस्पोजल स्कॉड (BDS) यांसारख्या खास युनिट्स देखील विसर्जनासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com