Ajit Pawar : राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar & Raj Thackeray

Ajit Pawar : राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल होत राज यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले. दरम्यान, राज यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे अजित पवार राज यांच्या शिवतीर्थव जाऊन गणपतीचं दर्शन घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तुम्हीदेखील राज यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, सध्यातरी माझा काही असा काही विचार नाहीये. यापूर्वी राज ठाकरे आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. आमच्या दोघांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात याचा अर्थ आम्ही काही एकमेकांचे शत्रू नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार राज यांच्या शिवतीर्थव जाऊन गणपतीचं दर्शन घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीवर केलं भाष्य

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज यांच्या निवास्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी ही भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार आपण अनेकांच्या घरी जाऊन भेट घेत असतो. त्यात वाईट वाटायचं काय कारण ? असे पवार म्हणाले.

Web Title: Ganeshotsav Ajit Pawar Comment On Raj Thackeray Home Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..