

Ganeshotsav Special shivsena express
ESakal
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनासाठी अनेकजण कुटुंबासह आपल्या गावाकडे जातात, यामध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गणेश उत्सवाच्या २-३ महिना आधीपासूनच तिकीट बुकिंग करण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागते. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्या सोडल्या जातात. अशातच यंदा गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्यामुळे प्रवाशांना गावी जाण्याचा प्रवास फ्रीमध्ये करता येणार आहे.