
येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून, कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील बैठकीत दिली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.