esakal | गणेशोत्सवात केवळ 7 दिवसांची सुट्टी ? शिक्षक संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati festival

गणेशोत्सवात केवळ 7 दिवसांची सुट्टी ? शिक्षक संभ्रमात

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: राज्यात आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात (Ganpati festival) शाळांना 7 दिवसांची सुट्टी (holidays) देण्यासाठी पालक-शिक्षक (parents-teacher union) संघाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, असे शिक्षण निरीक्षक कार्यालयाने नवीन आदेश (New Order) या उत्सवाला सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर काढले आहेत, यामुळे या कालावधीत नेमक्या किती सुट्ट्या मिळतील याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम (teachers confusion) निर्माण झाला आहे.

हेही वाचा: 'BMC' मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती; फेरिवाल्यांवर होणार कारवाई ?

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी विद्यार्थी हित आणि या दरम्यान येत असलेल्या बारावीच्या फेरपरीक्षा लक्षात घेऊन गणेशोत्सवाची 7 दिवस सुट्टी दिली जावी अशी मागणी शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग यांच्याकडे केली होती. त्यावर विभागाने एक आदेश जारी केले आहे. त्यात गणेशोत्सव सणानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना किमान 7 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 व शासनाचे प्रचलित आदेश, नियम, मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल.

या अटीचे अधीन राहून शाळांच्या सुट्टयांचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर करण्यात यावी. एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे या आदेशात म्हटले आहे. मात्र हे आदेश गणेशोत्सवाच्या केवळ एक दिवस आगोदर आल्याने शाळा, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याची शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top