esakal | 'BMC' मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती; फेरिवाल्यांवर होणार कारवाई ?
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

'BMC' मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती; फेरिवाल्यांवर होणार कारवाई ?

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : ठाणे महानगर पालिकेच्या (thane municipal) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (kalpita pimple) यांच्यावर फेरीवाल्यांने (hawkers attack) हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई (bmc action) सुुरु केली आहे. मुंबई महानगर पालिकेतही अशाच कारवाईची तयारी सुरु आहे. त्यासाठी विभाग पातळीवर कंत्राटी पध्दतीने कामगारांची (labor on contract) भरती करण्यास सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनीही सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: कोरोनामुक्त नागरिकांच्या सांधेदुखी, श्वसनविकारांमध्ये वाढ

ठाण्यातील घटनेनंतर आज अंबरनाथ मध्येही फेरीवाल्याने पालिकेच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.महामुंबईतील अनेक भागात फेरीवाल्यांची मुजोरी वाढू लागल्याच्या घटना घडल्या आहे.आतापर्यंत ग्राहक, पादचाऱ्यांना या मुजोरीचा फटका बसला आहे. याबाबत नेहमीच तक्रारी येत असतात. मात्र,ठाण्यातील घटनेनंतर फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी वाढू लागली. मुंबई महानगर पालिकेने फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी जुळवा जुळव सुरु केली आहे.

के पश्‍चिम प्रभाग अंधेरी,जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील भाग नेहमीच वर्दळीचा असतो.अरुंद रस्ते त्यात वाहनांची संख्या अशाचत फेरीवाल्यांचाही उच्छांद आहम. या प्रभागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रभाग कार्यालयाने जुळवा जुळव सुरु केली आहे.अतिक्रमण निर्मुलन वाहानांवर जानेवारी 2022 पर्यंत 20 कंत्राटी कामागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी अशासकीय संस्था,मजूर संस्था,बेरोजगार संस्था तसेच इतर सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संपुर्ण मुंबईतील बेदरकार फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नोंदीत फक्त 99 हजार

महानगर पालिकेने फेरीवाला धोरणासाठी फेरीवाल्यांकडून अर्ज मागवले होते.यात,फक्त 99 हजार फेरीवाल्यांनीच अर्ज केले.मुंबई सारख्या महाकाय शहरात हा आकडा नगण्यच आहे. प्रत्यक्षात आज मुंबईच्या रस्त्यावर 3 ते 4 लाखाहून अधिक फेरीवाले असण्याची शक्यता आहे.मुंबईतील काही भागात फेरीवाल्याचे माफिया तयार झाले असून नवीन ठिकाणी जागा अडविणे तेथे फेरीवाले बसवून त्यांच्याकडून भाडे वसुल केले जाते.असे प्रकारही अनेक वेळा उघड झाले आहे.अनेकवेळा पालिकेच्या पथकांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

loading image
go to top