esakal | गणपती बप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्यांना ठाकरे सरकारचं मोठं गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Toll plaza

गणपती बप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्यांना ठाकरे सरकारचं मोठं गिफ्ट

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस वे ने कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी मिळाली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंत्री एकनाथ शिंदेंची यांनी टोल माफीची घोषणा केली आहे. गणेशोत्सवासाठी (ganpati) कोकणात (kokan) जाणाऱ्यांना टोल माफी (Toll wave) मिळण्याची शक्यता होती. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि गणेशोत्सव समितीची बैठक झाली. गणेशोत्सवा दरम्यान अनेक महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. दरवर्षी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात गणपतीसाठी जातात.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी आज बैठक झाली. कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा आज निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जाईल. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसा नंतर पर्यंत ही सेवा असेल.

टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापुरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळाली आहे. गणेशोत्सवाला आता अवघे पाच दिवस उरले आहेत.

हेही वाचा: 'तुम्ही ठिकाण निवडा', नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना ओपन चॅलेंज

मुंबईतून कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये कोकणात जाणाऱ्या खासगी, सरकारी बसेस, कोकण रेल्वे फुल्ल असते. सहज तिकीट मिळत नाही. खासगी वाहनाने मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात गणपतीसाठी जातात. यंदा या सर्वांना टोलमाफीची भेट मिळाली आहे.

loading image
go to top