esakal | 'तुम्ही ठिकाण निवडा', नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना ओपन चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

'तुम्ही ठिकाण निवडा', नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना ओपन चॅलेंज

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: भारतात तालिबानचे (Taliban) समर्थन करणाऱ्या मुस्लिमांवर (Muslim) टीका करताना गीतकार जावेद अख्तर (javed akthar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानसोबत तुलना केली. एका वृत्तवाहिनीवर बोलताना जावेद अख्तर यांनी केलेल्या या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या आमदारांकडून केली जात आहे. कांदिवलीचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यापाठोपाठ आता कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गीतकार जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे.

"मी तुम्हाला एक आठवड्याचा अल्टिमेटम देतो. तुम्ही जे म्हणालात, ते कसं योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरुम तुम्ही निवडा. डिबेटमध्ये तुमच्या मनातील द्वेष आणि तुमच्या सर्व गैरसमजुतींची उत्तरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत. हे मान्य नसेल, तर तुम्ही सर्व हिंदुंची बिनशर्त माफी मागा" असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा: अखेर तालिबानने जिंकलं पंजशीर खोरं

एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत तुम्ही तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणं हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतोय, असं नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात ट्रिपल तलाक सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचं धाडस केलं नाही, असा आरोप नितेश राणेंनी केलाय.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील लोकांना आधी शिकवावं - फडणवीस

जावेद अख्तर काय म्हणाले...

भारतात तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांची संख्या फार कमी असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. उजवी विचारसरणी सुद्धा दडपशाही करणारी असल्याचे त्यांचे मत आहे. तालिबान आणि ज्यांना तालिबान सारखे बनायचेय, त्यांच्यात भीतीदायक साम्य असल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितलं.

"भारतातील मुस्लिमांच्या फार छोट्या वर्गाने अफगाणिस्तानात तालिबानचं समर्थन केलं आहे. मी ज्या मुस्लिमांशी बोललो, त्यातले अनेकजण काहींनी अशी विधाने केल्यामुळे हैराण होते. भारतातील तरुण मुस्लिमांना चांगला रोजगार, चांगलं शिक्षण आणि मुलांसाठी चांगली शाळा हवी आहे" असे जावेद अख्तर म्हणाले.

अतुल भातखळकरांचा इशारा

"जावेद अख्तर विसरतायत, हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करतायत. हिम्मत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन टीका करा" असे आव्हान त्यांना भातखळकरांनी दिलं आहे. "जावेद अख्तर यांनी आपलं विधान मागे घेऊन, हिंदू सामाजाची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करु" असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

loading image
go to top