
Uddhav Thackeray: ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडेंना दणका
ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे कुटूंबियांवर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करत याविरोधात गौरी भिडे यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने भिडे यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळताना गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ही ठोठावला आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने गौरी भिडे यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.
याउलट कार्यकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचिका दाखल केली परंतु त्यामध्ये काही पुरावे नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. 22 नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडेंची नव्या खंडपीठापुढे धाव घेतली होती.
प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. तर उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले, त्यामुळे उद्धव ठाकरे कुटुंबाला त्यांच्या संपूर्ण संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून सादर करावी लागली होती.
काय आहे प्रकरण?
गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात त्यांनी 11 जुलै 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रारही दाखल केली होती.
मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनीलॉन्ड्रिंगचे पुरावे असूनही कारवाई होत नाही, असा आरोप करत या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सर्वांना प्रतिवादी करण्यात आलेलं होत. मात्र आता न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती किती?
शेअर्समध्ये 22 कोटींची गुंतवणूक
उत्पन्नाचं स्त्रोत शेअर्समधून येणारा डिव्हिडंट
1 कोटी 61 लाखांची एफडी
मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरं
बाजार भावानुसार घराची किंमत 52 कोटी
कर्जतमध्ये एक फार्म हाऊस
23 लाखांची ज्वेलरी
एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक
3 एकर जमीन, भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
बाजारभावानुसार जमिनीची किंमत 5 कोटी
जमीन : मुरशेट, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
बाजारभावानुसार जमिनीची किंमत 14 कोटी
बँकेचं कर्ज 4 कोटी
रश्मी ठाकरे यांची संपत्ती
35 लाखांची एफडी
शेअर्स आणि बॉण्डमध्ये 34 कोटींची गुंतवणूक
एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक
1 कोटी 35 लाखांची ज्वेलरी
जमीन : भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
जमीन : वैजनाथ, तालुका कर्जे, जिल्हा रायगड
जमीन : हुमगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
जमीन : कोरलाई, तालुका मुरूड, जिल्हा रायगड
जमिनीची एकूण किंमत 6 कोटी
घराची बाजारभावानुसार किंमत 30 कोटी
बँकेचं कर्ज 11 कोटी
आदित्य ठाकरे यांची संपत्ती?
एफडीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक
शेअर्स आणि बॉण्डमध्ये 20 लाखांची गुंतवणूक
65 लाखांची ज्वेलरी
जमीन : बिलावले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
बाजारभावानुसार जमिनीची किंमत 77 लाख रुपये
व्यावसायिक इमारत, श्रीजी आर्केड, ठाकुर्ली, कल्याण
बाजारभावानुसार किंमत 4 कोटी
एनएसएसमधील गुंतवणूक 3 लाख