
Prakash Ambedkar : ...त्यामुळं अदानींवर कारवाई होणार नाही! प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
पुणे : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी सध्या चर्चत आहेत. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं आहे. यावरुन त्यांनी पंतप्रधान मोदींनाही टार्गेट केलं आहे. अदानी PM मोदींच्या मांडीवर बसलेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (Gautam Adani will not be prosecuted Prakash Ambedkar told the reason)
आंबेडकर म्हणाले, आरआरएसचं मोदी सरकार अदानींना एलआयसीचे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे. एका बँकेचे पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या बँकेला द्यायचे अशा रीतीने अदानींचा निकाल लागला आहे. पण अदानी पंतप्रधानांच्या मांडीवर बसलेले असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार नाही. हे असे सुभेदार मोदी उभे करतात. हे असे लोक उभे राहिल्यानं देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी झाली. या देशाचं विभाजन कॉर्पोरेटमध्ये केलं जाईल. लोकांचा पैसा आता या भांडवलदारांकडे वळवला जातो आहे.
किती जणांना माहिती आहे की भारताचं सोनं गहाण ठेवलं गेलं आहे. भारताकडील ३५,००० टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलं होतं. नरेंद्र मोदींचा नवीन फंडा आहे की, देश चालवण्यासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा जमत नाही, मग कारखाने विकून देश चालवला जात आहे.
मोदी आणि भागवतांना मी प्रश्न विचारतो
मोदींना एका बाजूला बसवा आणि मी एका बाजूला बसतो. मी त्यांना ४ प्रश्न विचारतो त्यांनी याची उत्तरं द्यावीत. माझ्यासमोर एकतर मोदी पाहिजेत किंवा मोहन भागवत पाहिजेत बाकी कोणी नको.