ओमिक्रॉनचा धोका; मुंबई व पुण्यातील सर्व रुग्णांसाठी 'या' चाचणीवर भर| Omicron Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron variant

ओमिक्रॉनचा धोका; मुंबई व पुण्यातील सर्व रुग्णांसाठी 'या' चाचणीवर भर

मुंबई : एकीकडे राज्यात परदेशातून येणाऱ्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron patients) संख्या वाढत आहे. दुसरीकडे, राज्यात राहणाऱ्या लोकांना कोविडची लागण (corona infection) होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पुण्यात (omicron patients in Mumbai and pune) पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. (Genome sequencing tests for omicron patients from mumbai-pune region)

हेही वाचा: जेव्हा दगड जिवंत होऊन बोलू लागतात!

ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारला महाराष्ट्रात सामुदायिक पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शहरांसाठी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे आणि सध्या सर्वात जास्त ओमायक्रॉन रुग्ण, मुंबई आणि पुणे या शहरांची निवड करण्यात आली आहे. सामुदायिक देखरेखीद्वारे, या दोन शहरांमध्ये कोविडची लागण झालेल्या रुग्णाचे नमुने जी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.

जेणेकरून शहरात सध्या जे काही प्रकार आहेत, ते कोणत्या प्रकारामुळे त्रस्त आहेत, हे कळू शकेल. आतापर्यंत मुंबईत परदेशातून आलेल्या कोविड बाधितांचे नमुने, केवळ गंभीर कोविड रुग्णांचे नमुने आणि मुंबईतील हॉट स्पॉट्समधून पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातात.

हेही वाचा: राज्यात कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला; जाणून घ्या सविस्तर माहिती

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, केंद्र सरकारसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आम्हाला मुंबई आणि पुण्यातील सामुदायिक देखरेखीखालील सर्व पॉझिटिव्ह केसेस जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवायचे आहेत. यामुळे आम्हाला कोविडपासूनच्या या युद्धात पुढील नियोजन करण्यास मदत होईल.

राज्यात 100 ओमिक्रॉन रुग्ण

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 100 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक 46 रुग्ण मुंबईत तर 19 रुग्ण पुण्यात आहेत. सध्या या जिल्ह्यांमध्ये सामान्य कोविड रुग्णांची संख्याही वाढत आहे.

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत असलेल्या मशीनमध्ये एकाच वेळी 300 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करता येते. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या जास्त असल्यास त्यांचे नमुने अन्य प्रयोगशाळेत पाठवावेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भविष्यातील रणनीती तयार करण्यात मदत 

"कम्युनिटी सर्विलांसचा निर्णय चांगला आहे. सध्या कोरोना विषाणूचे दोन प्रकार आहेत, एक डेल्टा आणि दुसरा ओमायक्राॅन. दोन्ही आजाराची पद्धत वेगळी आहे. डेल्टा अधिक प्राणघातक आहे, ओमायक्रॉन देशात घातक असेल की सौम्य याबाबत काहीही सांगता येत नाही. इतर देशांमध्ये ओमायक्रॉनची तीव्रता खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, दोन स्ट्रेनमधील फरक जाणून घेणे फार महत्वाचे आहे. हे आम्हाला पुढील रणनीती तयार करण्यास मदत करेल."

- डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोविड टास्क फोर्स

Web Title: Genome Sequencing Tests For Omicron Patients From Mumbai Pune Region Omicron Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top