stone workshop Jahangir art gallery
stone workshop Jahangir art gallerysakal media

जेव्हा दगड जिवंत होऊन बोलू लागतात!

गिरणगावातील कलाकारांचे ‘जहांगीर’मध्ये प्रदर्शन

शिवडी : मुंबईच्या फोर्ट येथील जहांगीर आर्ट गॅलरीत (Jahangir art gallery) ‘दगड’ (Stone Workshop) हे आगळे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात लोखंडासह (Iron) स्टील (Steel and coper metal) आणि तांबे या धातूंच्या मदतीने जगातील भूगर्भीय बदलांवर कलात्मकरीत्या प्रकाश टाकण्यात आला आहे. गिरणगावात (Girgaon) राहणाऱ्या मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्नील गोडसे (Swapnil Godse) याने या कलाकृती साकारल्या आहेत. (Stone workshop in jahangir art gallery mumbai)

stone workshop Jahangir art gallery
ठाणे : युवा साहित्य संमेलनाचे जानेवारीत वाजणार बिगुल

स्वप्नीलने विविध कलाकृतींमधून भूगर्भीय बदल आणि मानवी स्वभावाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन सुप्रसिद्ध कलावंत प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२१) पार पडले. येत्या सोमवारपर्यंत (ता.२७) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना प्रदर्शन पाहता येईल. इतर कलावंतांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न स्वप्नीलने साकारलेल्या कलाकृतीत केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मत प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्त केले. आपण प्रवासात असताना वेगवेगळ्या प्रकारचे दगड, डोंगर पाहत असतो.

अनेक वेळा दरडीच्या रूपात मोठ-मोठे दगड रस्त्यावर कोसळतात. रस्त्याच्या रुंदीकरणातही वेगवेगळ्या आकाराचे दगड आपण पाहतो. या प्रत्येक कामात दगडाची भूमिका आणि महत्त्व वेगवेगळे आहे. यामधील प्रत्येक दगड हा बोलका वाटतो. या दगडामधील जीवसृष्टीचे चिंतन आणि मनन करून त्यामागील सौंदर्यदृष्टी स्वप्नीलने त्याच्या कलाकृतीतून मांडली आहे. दुचाकी गाडी किंवा माल वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांमधून खाली होणाऱ्या दगडाचा प्रवासही त्याने न्याहाळल्याचे प्रदर्शनात दिसते. प्रत्येक दगडाला एक आकार आहे, रंग आहे, खाचखळगे आहेत, पोत आहे. या सगळ्यांची सांगड घालताना सर्व दगड हे त्रिकोणी आकृतीमध्ये दिसतात. मानवी अंग मांडताना मांडी घालून ध्यानस्त बसलेला जीवही त्रिकोणीच दिसतो.

stone workshop Jahangir art gallery
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी हायकोर्टाचा 'हा' महत्वाचा निर्णय

अशा प्रकारे दगडामधील परिवर्तन मानवी जीवनातील परिवर्तनाशी जोडण्याचा खूप सुंदर आणि वेगळा प्रयत्न स्वप्नीलने केला आहे, असेदेखील राजेशिर्के म्हणाले. स्वप्नीलने कलाकृतीमधून निसर्गातील बारीकसारीक कृतींवरही प्रकाश टाकला आहे. दगडावर उगवलेले छोटेसे झाड हेसुद्धा निसर्गातील बदल आणि भावनांना प्रदर्शित करते. दगड ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक परिस्थितीत त्या-त्या ठिकाणचा एक वेगळा रंग आणि आकार घेत असते.

दगडाप्रमाणेच वेगवेगळ्या वातावरणात माणसाची जडणघडणही तेथील परिस्थितीनुसार बदलत असते. एकूणच प्रदर्शनाचे नाव ‘दगड’ असले, तरी दगडाच्या जडणघडणीचा संबंध निसर्गाशी जोडताना त्यातून मानवी स्वभावाचे दर्शन घडवण्याचा समतोल या प्रदर्शनातून साधण्यात कलावंत यशस्वी ठरल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्ध आर्किटेक्ट कुणाल मनियार यांनी दिले.रिक्षा आकर्षणाचा बिंदू सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी रिक्षा प्रदर्शनातील आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत असून प्रेक्षकांसाठी सेल्फी पॉईंट झाला आहे. आपल्या कल्पक बुद्धीने स्वप्नीलने साकारलेली धातूची रिक्षा दगडाचा प्रवास दाखवत आहे. या कलाकृतीचे सर्वच कौतुक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com