‘डीजेमुक्त सोलापूर’साठी करा ‘या’ क्रमांकावर मिस कॉल! वीरशैव व्हिजन अन्‌ डीजेमुक्त सोलापूर कृती समितीचा पुढाकार, सविस्तर वाचा...

डीजेमुक्त सोलापूरसाठी 9168 729 729 वर मिस्ड कॉल करा आणि डीजेमुक्तीच्या अभियानाला बळ द्या, असे आवाहन वीरशैव व्हिजन आणि डीजेमुक्त सोलापूर कृती समितीने केले आहे. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय माने यांनी ही घोषणा केली. मिस्ड कॉल केल्यानंतर संबंधितांना धन्यवादाचा एसएमएस येणार आहे.
Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025Sakal
Updated on

सोलापूर : डीजेमुक्त सोलापूरसाठी 9168 729 729 वर मिस्ड कॉल करा आणि डीजेमुक्तीच्या अभियानाला बळ द्या, असे आवाहन वीरशैव व्हिजन आणि डीजेमुक्त सोलापूर कृती समितीने केले आहे. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय माने यांनी ही घोषणा केली. मिस्ड कॉल केल्यानंतर संबंधितांना धन्यवादाचा एसएमएस येणार आहे.

डीजेमुक्त सोलापूर प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठे जनमत व्यक्त होणे आवश्यक आहे. लाखो सोलापूरकरांच्या मनात असलेली डीजेमुक्तीची आस अधिकृतपणे नोंदली जावी, यासाठी मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध केल्याचे बुरकुले यांनी सांगितले. डीजेमुक्ती अभियान केवळ एखाद्या उत्सवापुरते मर्यादित राहणार नाही. सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव आणि कोणत्याही कार्यक्रमातील डीजेचा गोगाट कायमस्वरूपी बंद व्हावा, यासाठी हे अभियान असल्याचे ॲड. माने यांनी सांगितले.

पारंपरिक वाद्य, महापुरुषांचा संदेश समाजात पोहोचावा यासाठी व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम याला प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला कृती समिती सदस्य असीम सिंदगी, कौस्तुभ करवा, राहुल शेटे, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, धानेश सावळगी, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.

डेटा असेल सुरक्षित

मिस्ड कॉलमधील डेटा सुरक्षित असणार आहे. गोपनीयता पाळली जाणार आहे. याचा उपयोग डीजेमुक्तीच्या कायदेशीर लढ्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. या उपक्रमाला वेकअप सोलापूर डिजिटल मॅगझीनचे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com