पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत सवलती द्या : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

मुंबई - ‘मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात,’’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटील म्हणाले की, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास कालावधी लागत असताना भाजप सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या. पण भाजप सरकारच्या ‘सारथी’सारख्या अनेक उपक्रमांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अडथळे निर्माण केले आहेत आणि आर्थिक तरतूद रोखून संकटे निर्माण केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. ‘‘सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय गेल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ढिलाई केली आणि आरक्षणाला स्थगिती आली.’’ असे  ते म्हणाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सारथी’ला पाठबळ द्या
‘आमच्या सरकारने १३ उपक्रम सुरू केले होते. अत्यंत जोमाने काम चालू होते ते सर्व बंद केले आहेत. ‘सारथी’ संस्थेची स्वायत्तता काढली. सरकारने आपली भूमिका बदलून सारथी संस्थेला पाठबळ दिले पाहिजे,’’ अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give discounts until you get a reservation again chandrakant patil