

Dhule
esakal
धुळे: गोव्यात साधू असल्याचे भासवून एका नागरिकाची फसवणूक करून पसार झालेल्या आंतरराज्य टोळीतील तिघा ठगांना धुळे तालुका पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. संशयितांकडून गुन्ह्यातील सोन्याची चेन आणि अंगठी, असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.