esakal | 'या' रोगामुळे गावेच्या गावे उठली होती; कोरोनापेक्षाही होता भयान... सविस्तर वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Goddess disease

देवीचा विक्रम अजून तरी इतर कोणत्याही रोगाने मोडलेला नाही. असे म्हणले जाते. १९७७ ला देवी रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेले आहे

'या' रोगामुळे गावेच्या गावे उठली होती; कोरोनापेक्षाही होता भयान... सविस्तर वाचाच

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

जगभरात काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावर अद्याप लस न आल्यामुळे पूर्ण जग हवालदिल झालं आहे. देशात यापूर्वीही अशा संसर्गजन्य आजाराने ग्रासल्याच्या नोंदी आहेत. कॉलरा, प्लेग, देवी आणि फ्ल्यू हे काही प्रमुख रोग आहेत. यात देवीच्या आजाराच्या आठवणी ऐकताना अंगावर शहारे येतात. देवी रोगामुळे कित्येक लोकांचा बळी गेला आहे. कालंतराने देवीची लस निघाली आणि देवीने भूतलावरून काढता पाय घेतला. पण, कोरोनावर कधी औषध निघणार हा प्रश्न आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी अनेक उपाय योजना सरकार करत आहे. पण अद्याप औषध निघालेले नाही.

देवीचा विक्रम अजून तरी इतर कोणत्याही रोगाने मोडलेला नाही. असे म्हणले जाते. १९७७ ला देवी रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेले आहे. हा रोग कोणत्या दिवशी नष्ट झाला याबात अधिकृत कोणीही सांगत नाही. एका ठिकाणच्या नोंदीनुसार ५ जुलैला शेवटचा रुग्ण सापडल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्तानेच राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी झालेला हा संवाद...

देवी हा रोग अनेकांना माहीत असणार. या रोगाच्या लक्षणांची अचूक वर्णने भारतीय व चिनी प्राचीन साहित्यात आढळतात. यापूर्वीही प्लेग, कॉलरा, देवी अशा अनेक साथीच्या आजारांनी जगभरात लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. रोगांच्या साथी व साथीचे रोग तसे आपल्याला नवीन नाहीत. नवनवीन साथीच्या आजारांनी जगाला वेठीस धरले होते. देवी या रोगानेसुद्धा अनेक लक्षावधी मानवांचा बळी घेतला आहे. सर्व जगभर या रोगाचा बहुद्देशीय प्रादुर्भाव वारंवार झाला आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत या रोगामुळे मानवाच्या जीवनावर भयंकर त्रास दिला आहे. देवी या रोगामुळे गावेच्या गावे ओस पडली होती, यावेळी असंख्य लोक विद्रूप झाल्याची, अनेकांना अंधत्व आल्याची पुष्कळ उदाहरणे दिलेली आहेत. रोगाच्या लक्षणांची अचूक वर्णने भारतीय व चिनी प्राचीन साहित्यात आढळतात. प्लेग यांसारख्या भयंकर रोगांप्रमाणेच देवीने सुद्धा लक्षावधी मानवांचा बळी घेतला आहे. सर्व जगभर या रोगाचा बहुद्देशीय प्रादुर्भाव वारंवार झाला आहे, मराठी विश्वकोशमध्ये याच्या नोंदी आहेत.

यावेळी राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. आवटे म्हणाले, देवी हा आजार अठराव्या-एकोणिसाव्या  शतकांपर्यत सुरूच होता. दोन- तीन शतक या आजाराने अनेकांचा बळी घेतला आहे. त्या काळात वैद्यकीय सोयीसुविधा नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे देवी हा रोग म्हणजे महाभयंकर काळ होता. त्या काळात मोठी लसीकरणाची मोहीम घेतली. मानवी आरोग्याच्या इतिहासात देवी हा पहिला आजार आहे कि त्याचे इतिहासात उच्छाटन केलं आहे. सध्या कुठेही देवी रोगाचे विषाणू नाही. फक्त प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ठेवण्यात आला आहे. 

असा होता देवी आजार... 

देवी हा आजार खरचं खुप भयानक होता. माणसांच्या अंगावर फोड, पुरळ  येत असे. माणूस शिंकताना, खोकताना बाहेर पडणाऱ्या दवपदार्थामुळे हा आजार सगळीकडे पसरायचा. ब-याचदा रुग्ण यावेळी दगावले जायचे. त्यामुळे गावांच्या गावं ओस पडायची‌. खरंतर या आजाराचे पुरावे खूप वर्षापासून आहेत. संस्कृतमध्ये आणि चिनी भाषेत या आजाराचा वर्णन केलं आहे.

देवी रोग येथे  प्रथम पोहोचविला... 

अमेरिकेचा शोध लागल्यानंतर पंधरा वर्षांनी, १५२० च्या सुमारास, स्पॅनिश लोकांनी देवीचा रोग पश्चिम गोलार्धात प्रथम पोहोचविला. भारतात याची तीव्रता खूप होती.

देवी कोणत्याही वयात तो होऊ शकतो...

देवी हा रोग एकदा होऊन गेलेल्या रोग्यास पुन्हा होत नाही म्हणजेच त्याच्यामध्ये आयुष्यभर पुरेशी प्रतिरक्षा तयार होते. या रोगाविरुद्ध नैसर्गिक प्रतिरक्षा असत नाही. सर्व जाती व वंश तसेच कोणत्याही वयात तो होऊ शकतो. गौरवर्णियांपेक्षा काळ्या रंगाच्या लोकांमध्ये तो होण्याचा संभव अधिक असतो.

१९७७ ला भारतातील देवी रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन झाले...

जागतिक आरोग्य संघटनेने देवीनिर्मूलनाची जोरदार मोहीम हाती घेतली. १९७४ पासून तेथील देवीचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन १९७५ ला देवी रोगाची शेवटची नोंद झाली आहे. त्यानंतर १९७७ ला भारतातील देवी रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन झालेले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रशस्तिपत्रक देऊन सांगतिले आहे

पशुंतील देवी ... 

देवी हा रोग  गाय, म्हैस, घोडा, मेंढी, शेळी, डुक्कर व उंट या पशूंना देवी येतात. माणसाप्रमाणेच सर्व जनावरांमधील देवीच्या फोडांच्या रंजिका, उत्स्फोटक, पिटिका, पुटिका, पूयिका व खपली या अवस्था कमीअधिक प्रमाणात स्पष्ट दिसतात. नैसर्गिक रीत्या देवी येऊन गेलेल्या जनावरांना पुन्हा देवी येत नाहीत.
 

loading image