मोठी खुशखबर! विमानसेवेनंतर आता जानेवारीपासून सोलापुरातून धावणार ईलेक्ट्रिक बस; रिक्षापेक्षा असणार खूप कमी तिकीट; चार्जिंग स्टेशनचे काम सुरू

केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई- बस सेवा’ योजनेतून सोलापूर महापालिकेला शहरासाठी १०० ईलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० बस येणार आहेत. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. वसंत विहार सबस्टेशनवरून ३३ केव्हीची लाईन त्याठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे.
solapur city charging station

solapur city charging station

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई- बस सेवा’ योजनेतून सोलापूर महापालिकेला शहरासाठी १०० ईलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० बस येणार आहेत. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. वसंत विहार सबस्टेशनवरून ३३ केव्हीची लाईन त्याठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे.

सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची सद्य:स्थिती खूपच बिकट आहे. कधीकाळी १०० हून अधिक बसगाड्या असलेल्या या उपक्रमाकडे सध्या १७ ते १८ बस आहेत. त्याही १२ ते १४ वर्षांच्या जुनाट आहेत. दुसरीकडे प्रवाशी वाढल्याने सोलापूर शहरात दरमहा सरासरी ५० ते ५५ रिक्षा वाढत आहेत. पण, आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत ईलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यातून रिक्षाच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे.

दरम्यान, वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक-हॉटेल ॲम्बेसेडर- प्रभाकर महाराज मंदिर- सम्राट चौकातून पुढे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत जमिनीअंतर्गत लाईन नेली जात आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असून एक महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चार्जिग स्टेशनच्या कामासाठी अंदाजित साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शहरातील रस्त्यांमुळे १०० बस ९ मीटरच्याच

रस्त्यांवरील अतिक्रमण, अरुंद रस्ते, वाहनांची विशेषत: रिक्षांची वर्दळ, पार्किंगची असुविधा, अशी सोलापूर शहरातील स्थिती आहे. या बाबींमुळे सोलापूर महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणाऱ्या १०० बसगाड्या १२ मीटर नको तर नऊ मीटरच्याच द्याव्यात, असे कळविले आहे. पहिल्या टप्प्यात ३० आणि उर्वरित बस पुढील टप्प्यात मिळणार आहेत. शहरातील २२ तर ग्रामीणमधील २४ मार्गांवर या बस धावतील, असेही नियोजन आहे.

चार्जिग स्टेशनचे काम सुरू

वसंत विहार सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत ३३ केव्हीची लाईन नेली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर ते काम संपविण्याचे नियोजन असून त्याचे काम सध्या सुरू केले आहे. चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी सुरवातीला सहा पॉईंट काढले जातील.

- आर. सी. पाटील, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com