बळीराजासाठी खुषखबर ! कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर 

तात्या लांडगे
Tuesday, 21 July 2020

ठळक बाबी... 

  • बॅंकांनी पाठविली सोलापूर जिल्ह्यातील 78 हजार 835 शेतकऱ्यांची माहिती 
  • आतापर्यंत 73 हजार 415 शेतकऱ्यांची पडताळणी होऊन बॅंकांना प्राप्त झाली यादी 
  • जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी 69 हजार 791 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे झाले आधार प्रमाणिकरण 
  • आतापर्यंत जिल्ह्यातील 65 हजार 195 शेतकऱ्यांना मिळाली 582 कोटी 11 लाख रुपयांची कर्जमाफी 
  • अद्याप शासनाकडे अडकली पाच हजार 420 शेतकऱ्यांची यादी; एक हजार 854 शेतकऱ्यांची यादी पुढील टप्प्यात

सोलापूर : जिल्ह्यातील 78 हजार 835 शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे. त्यापैकी 65 हजार 195 शेतकऱ्यांना आतापर्यंत 582 कोटी 11 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मंगळवारी (ता. 21) बॅंकांना जिल्ह्यातील एक हजार 770 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठविण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनमुळे ही योजना थांबली होती. आता कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. जिल्ह्यातील एकूण 78 हजार 835 शेतकऱ्यांपैकी 73 हजार 415 शेतकऱ्यांची यादी बॅंकांना प्राप्त झाली आहे. त्यापैकी 69 हजार 791 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणिकरण होऊनही तीन हजार 624 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून आज कर्जमाफीची पाचवी यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार 770 शेतकऱ्यांची यादी बॅंकांना मिळाली आहे. आता आधार प्रमाणीकरण झालेल्या एक हजार 854 शेतकऱ्यांना लाभासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

पाच हजार 420 शेतकऱ्यांची नावेच नाहीत 
जिल्ह्यातील बॅंकांनी अपलोड केलेल्या 78 हजार 835 शेतकऱ्यांपैकी 73 हजार 415 शेतकऱ्यांचीच नावे बॅंकांना शासनाकडून पाठविण्यात आली आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून 65 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभही मिळाला आहे. मात्र, पाच हजार 420 शेतकऱ्यांची नावेच यादीत आलेली नाहीत. या शेतकऱ्यांची नावे कशामुळे राहिली, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे या शेतकऱ्यांनी यादीत नाव आले की नाही पाहण्यासाठी बॅंकांमध्ये हेलपाटे सुरु केले आहेत. 

ठळक बाबी... 

  • बॅंकांनी पाठविली सोलापूर जिल्ह्यातील 78 हजार 835 शेतकऱ्यांची माहिती 
  • आतापर्यंत 73 हजार 415 शेतकऱ्यांची पडताळणी होऊन बॅंकांना प्राप्त झाली यादी 
  • जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी 69 हजार 791 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे झाले आधार प्रमाणिकरण 
  • आतापर्यंत जिल्ह्यातील 65 हजार 195 शेतकऱ्यांना मिळाली 582 कोटी 11 लाख रुपयांची कर्जमाफी 
  • अद्याप शासनाकडे अडकली पाच हजार 420 शेतकऱ्यांची यादी; एक हजार 854 शेतकऱ्यांची यादी पुढील टप्प्यात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmes Fifth list of debt waivers announced