‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता ‘आयटीआय’मध्ये सोलार अन्‌ इंटरनेटसह ‘या’ नव्या कोर्सचे धडे; बेरोजगारी कमी होण्याची आशा, सरकारी नोकरीतही संधी

सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत. त्यातून १४० विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नेाकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
ITI Admission
ITI Admissionsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत. त्यातून १४० विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नेाकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

इयत्ता आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआयमध्ये स्वयंरोजगारासह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध व्हावेत म्हणून नवनवीन कोर्स शिकविले जातात. पण, काळाच्या ओघात लोहारकाम, न्हावीकाम असे कोर्स बंद पडले. त्यामुळे अनेक आयटीआयला कुलूप लावावे लागले तर एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालये देखील बंद करावी लागली आहेत. सलग तीन वर्षे त्या कोर्सचे प्रवेश ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यावर ती तुकडी बंद केली जाते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आवश्यक असून त्यातून बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूरच्या शासकीय आयटीआयमध्ये दोन नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. तर बार्शीच्या आयटीआयमध्ये एक आणि पंढरपूरच्या आयटीआयमध्ये दोन नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत.

तसेच सांगोल्यातील आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन व फिटर या कोर्सची प्रत्येकी एक तुकडी सुरू केली जाणार आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढला आहे, पण ‘एमसीव्हीसी’साठी प्रवेश पुरेशा प्रमाणात होत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात १२ शासकीय तर २४ खासगी आयटीआय आहेत. सहा ठिकाणी ‘एमसीव्हीसी’चा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याच्या ११ तुकड्या आहेत.

लवकरच नवे कोर्स सुरू होतील

सोलापुरातील शासकीय आयटीआय आणि बार्शी, पंढरपूर, सांगोला येथील आयटीआयमध्ये काही नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. काळाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या आवडी व रोजगाराच्या संधी पाहून हा बदल करण्यात येत आहे. आगामी काळात या तुकड्या त्या आयटीआयमध्ये सुरू होतील.

- सुरेश भालचिम, जिल्हा व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सोलापूर

चार आयटीआयमधील नवीन कोर्स

  • १) सोलापूर (विजयपूर रोड आयटीआय) : इंटरनेट ऑफ हाय्‌ थिंग्ज्‌ (स्मार्ट सिटी) व सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

  • २) बार्शी : मॅकेनिकल ड्राप्ट्‌समन

  • ३) पंढरपूर : ड्राप्ट्‌समन सिव्हिल आणि मशिनिस्ट

  • ४) सांगोला : इलेक्ट्रिशियन व फिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com