पोलिस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! गणवेश भत्त्यात वाढ; गृह विभागाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police

पोलिसांसाठी आन बान शान आणि अभिमान असलेल्या खाकी वर्दीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Police : पोलिस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! गणवेश भत्त्यात वाढ; गृह विभागाचा निर्णय

मुंबई - राज्याच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण पोलिसांसाठी आन बान शान आणि अभिमान असलेल्या खाकी वर्दीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात गुरूवारी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घोषित केला. पोलिस अधिकाऱ्यांसाठी गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आधी 5 हजार रुपये भत्ता मिळत होता. आता प्रतिवर्षी 6 हजार रुपये मिळणार आहे. पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार, पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक यांना दर वर्षांकरिता प्रत्येकी 5000 रुपये गणवेश अनुदार मंजुर करण्यात आले होते. सदर गणवेश अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत विचार सुरु होता. त्यानुसार गणवेश अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांसाठीचा गणवेश अनुदान वाढीबाबतचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश अनुदान म्हणून 5 हजार रुपयाऐवजी 6 हजार रुपये गृह विभागाकडून दिले जाणार आहेत.