बचत गटातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! यावर्षी बॅंकांकडून मिळणार ६१५ कोटीचे कर्ज, व्याजदर ७ ते १२ टक्के, सुरवातीला ३०,००० विनापरतावा, नंतर ६०,००० रुपये

राज्यात अडीच लाखांवर बचत गट असून त्याअंतर्गत अडीच कोटींवर महिला संलग्नित आहेत. या महिलांना यंदा १५ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य केंद्र सरकारने दिले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांना ६१५ कोटींचे कर्जवाटप होणार आहे. वार्षिक ७ ते १२ टक्के व्याजदराने महिलांना हे कर्ज मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट तिप्पट असणार आहे.
two levels of mental illness women empowerment
Women will get a personal loanSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात अडीच लाखांवर बचत गट असून त्याअंतर्गत अडीच कोटींवर महिला संलग्नित आहेत. या महिलांना यंदा १५ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य केंद्र सरकारने दिले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांना ६१५ कोटींचे कर्जवाटप होणार आहे. वार्षिक ७ ते १२ टक्के व्याजदराने महिलांना हे कर्ज मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट तिप्पट असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 'उमेद' व 'महिला आर्थिक विकास महामंडळा'चे सध्या २५ हजार बचत गट आहेत. आता त्यात १७ हजार गटांची भर पडणार असून पावणेदोन लाख महिलांना जोडले जाणार आहे. किमान दहा महिला एकत्रित येऊन बचत गट स्थापन करू शकतात. गट स्थापन झाल्यावर सुरुवातीला त्या गटास केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ३० हजार रुपयांचे (एकूण ६० हजार रुपये) खेळते भांडवल दिले जाते. ही रक्कम परत न करता बचत गटाला वापरता येणार आहे. गटाला सहा महिने झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ६० हजार रुपयांचे कर्ज मिळते. ही रक्कम दीड लाख रुपयांपर्यंत वाढवून मिळू शकते.

याशिवाय 'उमेद' व 'महिला आर्थिक विकास महामंडळा'च्या मदतीने बँकांकडूनही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सात टक्के, तर तीन लाखांवरील कर्जासाठी १२ टक्क्यांपर्यंत व्याजदर असणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे कौटुंबिक प्रश्न सुटले असून अनेक महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. यंदा वाढीव उद्दिष्टानुसार कर्जवाटप व्हावे, यासाठी 'उमेद' व 'महिला आर्थिक विकास महामंडळा'चे अधिकारी गावोगावी दौरे करत आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी बचत गट महत्त्वाचा

"सोलापूर जिल्ह्यात २५ हजार महिला बचत गट असून त्यांतर्गत अडीच लाख महिला संलग्न आहेत. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आणखी १७ हजार बचत गट वाढविले जाणार आहेत. गावागावांतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटातील महिलांना राज्य व केंद्र सरकारकडून खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी मिळतो. याशिवाय बँकांकडून ६१५ कोटींचे कर्ज मिळणार आहे."

- सचिन चवरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद), सोलापूर

सोलापुरातील महिला बचत गटांची स्थिती

  • एकूण बचत गट

  • २५,०००

  • संलग्न महिला

  • २.५० लाख

  • सुरुवातीचे खेळते भांडवल

  • ३०,००० रुपये

  • यंदाचे कर्जवाटप उद्दिष्ट

  • ६१५ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com