खुशखबर! उजनी धरणावर दीड वर्षांत सुरु होईल जलपर्यटन; पर्यटन विकास महामंडळाचा पहिला सर्व्हे पूर्ण; उजनी, शिराळ, सुर्लीचा पर्याय; धरणाची मागितली १२ महिन्यांची पाणीपातळी

उजनीच्या बॅक वॉटरवरील उजनी, शिराळ व सुर्ली यापैकी एका गावाच्या हद्दीत १९० कोटी १९ लाखांचा खर्च करून जलपर्यटन सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने धरणाची खोली, पर्यटनाची नेमकी जागा, याचा पहिला सर्व्हे आता पूर्ण केला आहे.
Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण?
Ujjani Damsakal
Updated on

सोलापूर : उजनीच्या बॅक वॉटरवरील उजनी, शिराळ व सुर्ली यापैकी एका गावाच्या हद्दीत १९० कोटी १९ लाखांचा खर्च करून जलपर्यटन सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने धरणाची खोली, पर्यटनाची नेमकी जागा, याचा पहिला सर्व्हे आता पूर्ण केला आहे. आता धरणाच्या भिंतीपासून दोन किमी अंतरावरील ठिकाण, तेथील पाण्याची खोली (प्रत्येक महिन्यातील) व उपलब्ध शासकीय जागा-जमिनीची माहिती पाटबंधारे विभागाकडून घेतली जाईल. त्याचा नकाशा मिळाल्यानंतर महामंडळाकडून अंतिम पाहणी होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात केली जाणार आहे.

दरवर्षी रशियाच्या सैबेरिया भागातून, हिमालय, पूर्व युरोप, आफ्रिका येथून पक्षी धरणावर येतात. सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यात पसरलेल्या उजनीचे पाणी १४५ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. धरणाजवळून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग गेला असून धरणावरील जलपर्यटनासाठी ही जमेची बाजू आहे. याशिवाय दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा रेल्वे मार्गही कुर्डुवाडी- भीगवण या पट्ट्यातूनच गेला आहे.

पंढरपूरचा पांडुरंग, रुक्मिणी माता, तुळजापूरची आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक सोलापुरात येतात. त्यांच्यासाठी उजनीवरील जलपर्यटन आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. धरण परिसरात अनेक जुनी मंदिरे, राजवाडे आहेत. बॅक वॉटरला केळीचे क्षेत्र मोठे आहे. विविध प्रकारचे मासेही आहेत. साधारणतः २०२६च्या दिवाळीपूर्वी पर्यटन सुरू होईल, यादृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नियोजन सुरू आहे.

काही दिवसांत पर्यटनाच्या कामाला होईल सुरवात

उजनी धरणावरील जलपर्यटनासाठी निधी मंजूर झाला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पहिला सर्व्हेही झाला आहे. आता काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग व पर्यटन विकास महामंडळाकडून त्या त्या कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील. तत्पूर्वी, शेवटचा सर्व्हे होईल आणि काम सुरू होईल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

जानेवारीत होईल कामाला सुरवात

उजनी धरणावरील जल पर्यटन दीड वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या पहिला सर्व्हे झाला असून आता पाटबंधारे विभागाकडून आणखी माहिती घेतली जाणार असून पुढील महिन्यात दुसरा सर्व्हे पूर्ण होईल. त्यानंतर कामाला सुरवात होईल.

- सारंग कुलकर्णी, सल्लागार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

धरणाची मागितली १२ महिन्यांची पाणीपातळी

पावसाळा सुरू झाल्यापासून म्हणजेच जून ते मे या १२ महिन्यांत उजनी धरणात एकूण किती पाणीसाठा असतो, दरमहा कोणत्या भागात किती पाणी (खोली) असते, धरणाच्या भिंतीपासून दोन किमी अंतरावर बॅक वॉटरवरील कोणते गाव येते, त्याठिकाणी पाटबंधारे विभागाची स्वतःची किती जागा पर्यटनासाठी उपलब्ध होऊ शकते, त्याचा नकाशा (हद्द-खुणा) या बाबींची माहिती पर्यटन विकास महामंडळाने पाटबंधारे विभागाला मागितली आहे.

उजनी पर्यटनासंदर्भात...

  • उजनीची पाणीसाठवण क्षमता

  • १२३ टीएमसी

  • उजनीच्या पाण्याचा परिसर

  • १४७ किमी

  • उजनी एकात्मिक पर्यटन आराखडा

  • २८२.७५ कोटी

  • उजनी जलपर्यटनासाठीचा निधी

  • १९०.१९ कोटी

पर्यटकांसाठी काय असणार सुविधा

  • मनोरंजन केंद्र, रॉक पूल, बोट सफारी

  • हॉटेल, राहण्याची दर्जेदार सोय

  • सभागृह, बोर्ड रूम, लाइट हाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com