esakal | ‘ॲग्रोवन मार्ट’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

agrowonmart

शेतीसाठी आवश्यक अवजारांपासून ते दुग्ध व्यवसायासाठी लागणारे सर्व काही 'ॲग्रोवन मार्ट'मध्ये मिळणार आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि पशू वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांना जोडणारा दुवा म्हणून 'ॲग्रोवन मार्ट' काम करणार आहे.

‘ॲग्रोवन मार्ट’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या गरजांची पूर्तता करतानाच त्यांना हव्या असलेल्या वस्तू तातडीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूह सुरू करत असलेल्या ‘ॲग्रोवन मार्ट' या पुरवठा साखळी उपक्रमाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 

स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते ‘ॲग्रोवन मार्ट' या रिटेल पुरवठा साखळीचा प्रारंभ करण्यात आला. कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रांसाठीच्या गरजांची पूर्तता ‘ॲग्रोवन मार्ट'च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ‘ॲग्रोवन मार्ट'ची फ्रॅन्चाईझी मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मार्ट पार्टनर व्हावे लागणार आहे. त्यासाठीची निर्धारित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘ॲग्रोवन मार्ट'च्या टीमकडून सर्व प्रकारचे सहकार्य पुरविण्यात येणार आहे. ‘ॲग्रोवन मार्ट'ची फ्रॅन्चाईझी घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध घटकांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा  होत आहे.

अशी मिळवा माहिती...
‘ॲग्रोवन मार्ट' संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी ७७५७०००७७७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देणे अपेक्षित आहे. या क्रमांकावर राज्यभरातून अनेकांनी संपर्क साधला असून त्यांना ‘ॲग्रोवन मार्ट'च्या टीमकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्याचबरोबर तुम्ही ‘सकाळ’च्या वितरण विभागातील प्रतिनिधींशीही संपर्क साधू शकता. 'ॲग्रोवन मार्ट' बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.agrowonmart.com या संकेतस्थळाला भेट द्या.

काय आहे 'ॲग्रोवन मार्ट'?
शेतीसाठी आवश्यक साहित्य, अवजारांपासून ते दुग्ध व्यवसायासाठी लागणारे सर्व काही 'ॲग्रोवन मार्ट'मध्ये मिळणार आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि पशू वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांना जोडणारा दुवा म्हणून 'ॲग्रोवन मार्ट' काम करणार आहे. 'मार्ट पार्टनर' होऊन तुम्हाला 'ॲग्रोवन मार्ट' या पुरवठा साखळीचा भाग होता येणार आहे.

loading image
go to top