Vidhan Sabha 2019 : भाजपच्या मेगाभरतीत दोन नेत्यांचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन आदी प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. विधानसभेसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असताना भाजपमध्ये मेगा भरती कमी झालेली नाही. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मेगाभरतीचा कार्यक्रम सुरुच असून, आज (सोमवार) झालेल्या मेगाभरतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी प्रवेश केला. तसेच भाजपच्या मेगाभरतीला 4 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन आदी प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. विधानसभेसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असताना भाजपमध्ये मेगा भरती कमी झालेली नाही. 

भाजपच्या मेगाभरती म्हणजे 'विशेष कार्यक्रम'च्या मेसेजने विरोधकांची चांगलीच झोप उडवली असून, आज झालेल्या भरतीमुळे विरोधी पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपच्या कळपात सहभागी झाले आहेत. गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopichan Padalkar and Kashiram Pawra enters BJP before Maharashtra Vidhan Sabha 2019 election