माळवागद गावची घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी - पडळकर I | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोपीचंद पडळकर

'कोतवालच कसाई झाले पारधी समाजानं न्याय मागायचा तरी कुणाकडं?'

'माळवागद गावची घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी'

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. दरम्यान, राजकीय कारणांमुळं महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आता पुन्हा एकदा भाजपाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे. पारधी सामजाशी संबंधित एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी ही घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी असल्याची सणसणीत टीका केली आहे.

हेही वाचा: कोकणातील रिफायनरीबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

ट्विटमध्ये पडळकर म्हणतात, पारधी समाजाच्या माजी सरपंचासकट 60 कुटुंबावर गाव सोडून जंगलात जाण्याची वेळ आली. यवतमाळच्या माळवागद गावातली ही घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी आहे. बहुजन आदिवासींवर एवढा आकस कशाचा? पारधी महिलांवर अत्याचार झाले. वारंवार तक्रारी केल्या तरी कारवाई नाही. पिढ्यानं पिढ्या उध्वस्त झाल्या. कोतवालच कसाई झाले पारधी समाजानं न्याय मागायचा तरी कुणाकडं?, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सांगलीतील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला. या घटनेमुळे सांगलीत काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गनिमी काव्याने स्मारक परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे त्यांनी 'ड्रोन' कॅमेऱ्याद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी करून लोकार्पण केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: 'उत्तर'साठी 'मातोश्री'वरून हलली सूत्रं; अस्लम सय्यद यांची माघार

Web Title: Gopichand Padalkar Criticised Mahavikas Aghadi Govt On Malvagad Village Incidence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top